केळापूर, पुसद एसडीओ हायटेक

By Admin | Updated: January 31, 2015 00:13 IST2015-01-31T00:13:51+5:302015-01-31T00:13:51+5:30

कागदपत्रांची पूर्तता करूनही जात प्रमाणपत्र महिनोंगणती मिळत नव्हते. उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते.

Kelapur, Pusad SDO HiTech | केळापूर, पुसद एसडीओ हायटेक

केळापूर, पुसद एसडीओ हायटेक

यवतमाळ : कागदपत्रांची पूर्तता करूनही जात प्रमाणपत्र महिनोंगणती मिळत नव्हते. उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते. आता केळापूर आणि पुसद तालुक्यातील नागरिकांची ही समस्या दूर झाली असून तेथील नागरिकांना आॅनलाईन जात प्रमाणपत्र दिले जात आहे. लवकरच संपूर्ण जिल्ह्यात ही प्रक्रिया राबविली जाणार आहे.
प्रशासकीय कामकाजाची गती वाढविण्यासाठी सर्वच क्षेत्रात संगणकीकरण केले जात आहे. ग्रामीण आणि सर्वसामान्यांशी नाळ जुळली असलेल्या महसूल विभागाला पूर्णत: अद्यावत करण्याचे काम सुरू आहे. सातबारा आणि तत्स्म काही प्रमाणपत्र आॅनलाईन देण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता जात प्रमाणपत्रही आॅनलाईन दिले जात आहे. सर्वात प्रथम प्रमाणपत्र देण्याचा मान केळापूर आणि पुसद उपविभागीय कार्यालयाला मिळाला आहे. केळापूर येथील उपविभागीय अधिकारी संदीप महाजन तर पुसद येथील चंद्रकांत जाजू यांनी आपल्या डिजीटल स्वाक्षरीचा वापर करून आॅनलाईन जात प्रमाणपत्र वितरित केले आहे. मुहूर्तालाच आतापर्यंत दोनही कार्यालयाकडून ३८ प्रमाणपत्र वितरित केले आहे.
लवकरच ही प्रक्रिया संपूर्ण जिल्ह्यात राबविली जाणार आहे. महाआॅनलाईची संकल्पना घेऊन महसूल प्रशासनाच्या एकंदर कार्यपद्धतीतच बदल केला जात आहे. पूर्वी ठराविक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी चकरा माराव्या लागत होत्या. यात अनेक विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण होत होता. तहसील कार्यालयात पालकांची झुंबड दिसत होती. हीच संधी साधून दलालही सक्रिय झाले होते. आता आॅनलाईन प्रणालीमुळे थेट उमेदवाराला प्रमाणपत्राची प्रिन्ट काढता येणार आहे. शिवाय बायनरी कोडवरून आपल्या प्रमाणपत्राच्या अर्जाची स्थिती काय आहे हेसुद्धा जाणून घेता येणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Kelapur, Pusad SDO HiTech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.