काळविटाची शिकार, आर्णीतून शीर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 23:34 IST2017-09-06T23:34:30+5:302017-09-06T23:34:47+5:30
तालुक्यातील जंगलात काळविटाची शिकार झाल्याचा प्रकार पोलिसांच्या एका जप्ती कारवाईतून उघड झाला आहे. पोलिसांनी येथील एका घरातून काळविटाचे शिंगासहित शीर जप्त केले आहे.

काळविटाची शिकार, आर्णीतून शीर जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : तालुक्यातील जंगलात काळविटाची शिकार झाल्याचा प्रकार पोलिसांच्या एका जप्ती कारवाईतून उघड झाला आहे. पोलिसांनी येथील एका घरातून काळविटाचे शिंगासहित शीर जप्त केले आहे.
आर्णीचे ठाणेदार नंदकिशोर पंत यांच्या पथकाला शहरातील एका घरात वन्य प्राण्यांचे अवयव असल्याची टीप मिळाली. त्यावरून बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता पोलीस पथकाने एका शाळेनजीकच्या घरावर धाड घातली. तेथील नासीर भातनासे यांच्या घरातून काळविटाचे शीर जप्त करण्यात आले. त्याची स्थिती पाहता ही शिकार ताजी असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान पोलिसांनी शिकारी व जप्तीचे प्रकरण उत्तर आर्णी वनपरिक्षेत्राकडे पुढील कारवाईसाठी वर्ग केले आहे. ही शिकार नेमकी केव्हा झाली व कोणत्या जंगलात झाली, काळविटाच्या उर्वरित अवयव व मासांचे काय झाले, हे शोधण्याचे आव्हान वनपरिक्षेत्र अधिकाºयाकडे आहे. अशा अनेक शिकार जंगलात होत असाव्या असा अंदाज आहे.