उमरखेड तालुक्यातील कपाशी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 21:54 IST2018-10-14T21:53:51+5:302018-10-14T21:54:32+5:30
तालुक्यातील हजारो हेक्टरवरील कपाशी पीक धोक्यात सापडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा पुन्हा चुराडा होत असून पीक जगविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.

उमरखेड तालुक्यातील कपाशी संकटात
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : तालुक्यातील हजारो हेक्टरवरील कपाशी पीक धोक्यात सापडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा पुन्हा चुराडा होत असून पीक जगविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.
तालुक्यात सुरुवातीला दमदार पाऊस झाल्याने पिकांची स्थिती समाधानकारक होती. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरविल्याने पिके करपू लागली आहे. डौलदार दिसणारी पिके करपत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. अनेक शेतातील कपाशी पिवळी पडत आहे. पावसाअभावी बोंडांची लागणही कमी झाली आहे. त्यामुळे डोळ्यादेखत पीक करपताना शेतकरी हवालदिल झाले आहे.
तालुक्यातील टाकळी, नागापूर, रूपाळा, लिंबगव्हाण, मार्लेगाव, चुरमुरा, दगडथर, हरदडा, चिल्ली, वरूड बिबी, खरूस, सावळेश्वर, कारखेड, बिटरगाव, मोरचंडी, दराटी, चिल्ली, सुकळी, नागेशवाडी, करोडी, तिवडी, कृष्णापूर आदी परिसरातील कपाशी करपत आहे. विशेषत: डोंगरमाथ्यावरील पिके वाळू लागली आहे. कोरडवाहू कपाशीची अवस्था दयनीय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. यावर्षी चांगले पीक येण्याची अपेक्षा असताना पीक करपत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. यावर्षीही कपाशीचे पीक हातचे जाणार असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हे आहे.
परतीच्या पावसाची प्रतीक्षाच
शेतातील उभी पिके करपत असल्याने शेतकºयांना परतीच्या पावसाची प्रतीक्षा आहे. ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे त्यांनी आॅईल इंजीन, मोटारपंप बसवून ओलित सुरू केले. मात्र ओलिताची सोय नसलेल्या शेतकºयांना कोणताही पर्याय नाही. परिणामी कपाशी, तूर पीक संकट सापडले आहे.