फक्त कोरोना व्हायरसला हरविण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 05:00 IST2020-04-12T05:00:00+5:302020-04-12T05:00:19+5:30

येणाऱ्या काळात मावळणी परिसरातील खुटाळा, सोनखास, मैतापूर, सोनेगावातील गरजू नागरिकांनाही मास्कचे मोफत वाटप करण्याचा मानस या महिलांनी व्यक्त केला आहे. यासोबतच येथील महिलांनी चार क्विंटल धान्य जमा करुन गरजूंना वाटप करण्यात पुढाकार घेतला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधीतांची संख्या वाढत असल्याने मास्क वापरणे आवश्यक झाले आहे. परंतु ग्रामीण भागात अजूनही प्रत्येक जण मास्क वापरता दिसत नाही.

Just to beat the Corona virus | फक्त कोरोना व्हायरसला हरविण्यासाठी

फक्त कोरोना व्हायरसला हरविण्यासाठी

ठळक मुद्देसंडे अँकर । मावळणीच्या महिलांचा पुढाकार, स्वत: तयार केले मास्क, गरीब कुटुंबातील सदस्यांचा सेवाभाव

लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : तालुक्यातील मावळणी येथील चार महिलांनी एकत्र येत संपूर्ण गावाला कोरानोपासून बचाव करण्यासाठी मास्क वाटप करण्याचा विडा उचलला आहे. एवढेच नाही तर, या महिला येणाऱ्या काळात जवळपासच्या गावांनाही मास्कचा मोफत पुरवठा करणार आहे.
येथील दत्तकृपा ग्राम समूह बचत गटाच्या दीपाली जांभुळकर, ज्योत्स्रा भेंडे आणि रेखा शेरेकर या महिलांनी स्वत: मास्कची निर्र्मिती केली. यासाठी लागणारा कापड मनीषा काटे यांनी स्वखर्चाने उपलब्ध करून दिला. दीपाली जांभुळकर, ज्योत्स्रा भेंडे, रेखा शेरेकर या महिला रोज ५० ते ६० मास्क घरीच शिलाई मशिनवर स्वत: तयार करतात. त्यानंतर ते गावातील लोकांना वाटले जाते.
कोरोना विषाणूमुळे अनेकजण वेगवेगळ्या कारणांनी अडचणीत आले. अडचणीत सापडलेल्या लोकांना मदतीचा हात देणारे कमी नाही. प्रत्येक जण आवश्यकतेनुसार मदतीसाठी पुढे येत आहे. अशाप्रकारे कळंब तालुक्यातील मावळणी येथील चार महिलांनी गावातील नागरिकांना मोफत मास्क वाटप करुन माणुसकीचे दर्शन घडवित आहे.
येणाऱ्या काळात मावळणी परिसरातील खुटाळा, सोनखास, मैतापूर, सोनेगावातील गरजू नागरिकांनाही मास्कचे मोफत वाटप करण्याचा मानस या महिलांनी व्यक्त केला आहे. यासोबतच येथील महिलांनी चार क्विंटल धान्य जमा करुन गरजूंना वाटप करण्यात पुढाकार घेतला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधीतांची संख्या वाढत असल्याने मास्क वापरणे आवश्यक झाले आहे. परंतु ग्रामीण भागात अजूनही प्रत्येक जण मास्क वापरता दिसत नाही. परंतु ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत मास्कचे वाटप केल्यास कोरोनापासून बचाव होण्यास मदत होणार आहे.

मास्क लावूनच घराबाहेर पडा
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क लावूनच घराबाहेर पडा, असा संदेश मावळणी गावातील या मास्क तयार करणाºया महिलांनी दिला आहे. शिवाय वेळोवेळी हात स्वच्छ धुवा, रस्त्यावर येऊ नका, असे आवाहनही करण्यात आले आहे. लोकांना मास्कची अडचण भासू नये यासाठीच ही मेहनत घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Just to beat the Corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.