शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

मृत्यूच्या तांडवाने हादरला जोडमोहा परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 6:00 AM

जोडमोहा येथील वेल्डींग व्यावसायिक बाबाराव वानखडे यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या अस्थी विसर्जनासाठी रविवारी कुटुंबातील सदस्य तसेच मुली, जावई कोटेश्वर येथे गेले होते. मात्र तेथून गावाकडे परत येताना त्यांचे वाहन दरीत कोसळले. यात एकट्या जोडमोहा गावातीलच महादेव चंदनकर, किसन परसनकर, अंजना वानखडे आणि अमर आत्राम या चौघांचा मृत्यू झाला. शिवाय नातेवाईकांपैकीही आठ जण दगावले.

ठळक मुद्देआठ ठार : नातेवाईकाच्या अस्थी विसर्जनातून येताना भीषण अपघात

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : मृत्यूचा चेहरा नेहमीच आक्राळविक्राळच असतो. गावातला एकही जीव दगावला तरी खेड्यांमध्ये दु:खाची तीव्र शोकलहर दीर्घकाळ कायम असते. रविवारी तर जोडमोहाच्या नागरिकांनी तब्बल आठ मृत्यूचे तांडव अनुभवले. एकमेकांचे नातेवाईक असलेले हे आठ मृतदेह पाहताना अक्षरश: अनेकांना घेरी आली. तर गावात रविवारी रात्री कुणाच्याही घरी चूल पेटली नाही.कळंब-जोडमोहा मार्गावर रविवारी सायंकाळच्या सुमारास वाहन दरीत कोसळून हा भीषण अपघात झाला. आपल्या दिवंगत आप्ताचा मृत्यू पश्चातचा संस्कार पूर्ण करण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांवरच काळाने घाला घातला.जोडमोहा येथील वेल्डींग व्यावसायिक बाबाराव वानखडे यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या अस्थी विसर्जनासाठी रविवारी कुटुंबातील सदस्य तसेच मुली, जावई कोटेश्वर येथे गेले होते. मात्र तेथून गावाकडे परत येताना त्यांचे वाहन दरीत कोसळले. यात एकट्या जोडमोहा गावातीलच महादेव चंदनकर, किसन परसनकर, अंजना वानखडे आणि अमर आत्राम या चौघांचा मृत्यू झाला. शिवाय नातेवाईकांपैकीही आठ जण दगावले. या घटनेने जोडमोहाची पंचक्रोशी शोकसागरात बुडाली.मदतीसाठी धावले स्वयंसेवक, डॉक्टरअपघातग्रस्तांना यवतमाळच्या मेडिकलमध्ये आणताच रविवार असूनही डॉक्टरांनी प्रचंड धावपळ केली. तर प्रतिसाद फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनीही मदत केली. प्रतिसादचे राजू मदनकर, महाराष्ट्र सुरक्षा बल कर्मचारी अमोल जाधव, विश्वकांत गावंडे, जितेंद्र गोडबोले, करण स्वर्गे, आशा मेश्राम, रेश्मा ब्राम्हणकर, प्रशांत वरके, राजेंद्र सदावर्ते यांनी तत्काळ उपचारासाठी मदत केली.

टॅग्स :Deathमृत्यू