शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

२८ कोटींच्या कर्ज वसुलीत ‘जेटीं’चा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 06:00 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांची कर्जप्रकरणे वांद्यात आहेत. त्यामुळेच बँकेचा एनपीए (संभाव्य बुडित कर्ज) वाढतो आहे. एनपीएची निर्धारित मर्यादा जिल्हा बँकेने केव्हाच ओलांडली आहे. कर्ज पुनर्गठनामुळे हा एनपीए वाढल्याचे सांगून बँक स्वत:चा बचाव करताना दिसते. बँकेच्या कोट्यवधींच्या कर्जाची अनेक वर्षांपासून वसुली झालेली नाही.

ठळक मुद्देजिल्हा मध्यवर्ती बँक : अवसायक बदलविला, चक्क लिपिकाकडे ‘एआर’चे दोन प्रभार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दारव्हा येथील जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेकडे थकीत असलेल्या २८ कोटींच्या बुडित कर्जाच्या वसुलीसाठी बँकेला फारसे सोयरसूतक नसल्याचे दिसते. अवसायकाने त्या दृष्टीने प्रयत्न चालविले असता त्यांची अचानक उचलबांगडी करून चक्क लिपिकाला तेथे नेमले गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अमरावती येथील ‘जेटी’ अर्थात विभागीय सहनिबंधकांच्या (सहकारी संस्था) इशाऱ्यावरून हे सर्व फेरबदल सहकार प्रशासनाने केल्याचे सांगितले जाते.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांची कर्जप्रकरणे वांद्यात आहेत. त्यामुळेच बँकेचा एनपीए (संभाव्य बुडित कर्ज) वाढतो आहे. एनपीएची निर्धारित मर्यादा जिल्हा बँकेने केव्हाच ओलांडली आहे. कर्ज पुनर्गठनामुळे हा एनपीए वाढल्याचे सांगून बँक स्वत:चा बचाव करताना दिसते. बँकेच्या कोट्यवधींच्या कर्जाची अनेक वर्षांपासून वसुली झालेली नाही. त्यातील काही कर्ज प्रकरणे संचालकांच्या शिफारसीवरून मंजूर केली गेली होती. त्यामुळे या कर्जाच्या वसुलीत अनेकदा संचालकच आडकाठी निर्माण करीत असल्याचे सांगितले जाते. या संचालकांना ‘टेकओव्हर’ करून वसुली करण्याचे, थकबाकीदाराला नोटीस बजावण्याचे धाडस बँकेच्या कर्ज वसुली विभागाने दाखविल्याचे ऐकिवात नाही. तारण मालमत्तेपेक्षा अधिक रकमेचे कर्ज दिल्याचेही अनेक उदाहरणे जिल्हा बँकेत आहेत.दारव्हा येथील जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेतील २८ कोटी रुपयांचे बुडित कर्ज असेच वांद्यात सापडले आहे. ही पतसंस्था अवसायनात निघाली आहे. तेथे मोठे आर्थिक गौडबंगालही आहे. थकीत कर्जामागे घोटाळा हे प्रमुख कारण सांगितले जात असून या कर्जाची वसुली पतसंस्थेच्या संबंधित ६० संचालकांकडून होणे अपेक्षित आहे. या पतसंस्थेवर दारव्ह्याच्या सहायक निबंधकांना (एआर) अवसायक नेमण्यात आले होते. या अवसायकाने पतसंस्थेच्या इमारतीचा एक कोटी ३५ लाखात लिलाव केला. आंध्रप्रदेशातील व्यक्तीने हा लिलाव घेतला. मात्र त्यानंतर मंत्रालयातून राजकीय चक्रे फिरली आणि अमरावती येथील विभागीय सहनिबंधकांच्या आदेशावरून अचानक पतसंस्थेवरील अवसायकाची बदली करण्यात आली. त्याऐवजी एका लिपिकाला सहायक निबंधक व पर्यायाने अवसायकाचा अतिरिक्त प्रभार दिला.या लिपिकाकडे लगतच्या तालुक्याचाही सहायक निबंधकांचा अतिरिक्त प्रभार आहे. एका लिपिकाकडे चक्क दोन एआर व एका अवसायकाचा अतिरिक्त प्रभार असल्याने सहकार प्रशासनाच्या कर्तव्यदक्षतेभोवती प्रश्नचिन्ह लावले जात आहे. या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २८ कोटींच्या कर्ज वसुलीत सहकार प्रशासनानेच अप्रत्यक्ष अडथळा निर्माण केला आहे. त्याला जिल्हा बँकेतून छुपी साथ मिळत असल्याची माहिती आहे.आज संचालक मंडळाची बैठकबँकेच्या संचालक मंडळाच्या अनेक बैठका झाल्या. मात्र कोणत्याही बैठकीत २८ कोटींच्या या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी संचालकांनी अथवा व्यवस्थापन-प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतल्याची नोंद नाही. आता शनिवार २८ डिसेंबर रोजी संचालक मंडळाची महत्वाच्या विषयावर विशेष बैठक होत आहे. किमान आता तरी २८ कोटींच्या या थकीत कर्जाला बैठकीत वाचा फुटते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :bankबँक