‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड
By Admin | Updated: June 7, 2017 00:50 IST2017-06-07T00:50:08+5:302017-06-07T00:50:08+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल विभागातील विद्यार्थ्यांची अमरावती

‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल विभागातील विद्यार्थ्यांची अमरावती येथील श्याम इंडोफॅब प्रा.लि. या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. ही कंपनी टेक्सटाईल उद्योग क्षेत्रातील महत्त्वाची मानली जाते. युगा बोबडे, तेजस कापसे, प्रणय ढगे या विद्यार्थ्यांची आॅफ कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड झाली आहे.
कंपनीतर्फे जेडीआयईटीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या आॅफ कॅम्पस इंटरव्ह्यूकरिता संस्थापकीय व तांत्रिक सल्लागार प्रवीण ठोंबरे, ह्यूमन रिसोर्स मॅनेजर मूर्ती उपस्थित होते. सर्वप्रथम टेक्नीकल टेस्ट घेण्यात आली. यानंतर मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट इंजिनिअर ट्रेनी या पदावर नियुक्ती देण्यात आली असून दोन लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज घोषित करण्यात आले आहे.
‘जेडीआयईटी’च्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांची आतापर्यंत नेदरलँडस्थित कंट्रोल युनियन, व्हीएचएम इंडस्ट्रीज लि. अमरावती, आरएसजे इन्स्पेक्शन सर्विसेस प्रा.लि. मुंबई, डोनिअर सुटिंग लि. सुरत या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. उच्च शिक्षणासाठी इच्छुक विद्यार्थी वगळता आतापर्यंत ८० टक्के कॅम्पस प्लेसमेंट झाले आहे. आणखी काही टेक्सटाईल जगतातील प्रमुख उद्योग समूह महाविद्यालयात येत आहे. त्यामुळे जून अखेरपर्यंत १०० टक्के कॅम्पस प्लेसमेंट होण्याची संधी आहे. काही विद्यार्थ्यांना तर दोनपेक्षा अधिक कंपनीची संधी चालून आल्याने निवडीसाठी दोन ते तीन पर्याय त्यांच्यापुढे आहेत.