‘जेडीआयईटी’चे रासेयो शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 21:23 IST2018-01-25T21:21:49+5:302018-01-25T21:23:07+5:30
यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा इंस्टिट्यूट आॅफ इंजीनियरींग अॅन्ड टेक्नॉलॉजीच्या (जेडीआयईटी) राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या विशेष शिबिराचे आयोजन नेर तालुक्यातील सोनखास येथे करण्यात आले आहे.

‘जेडीआयईटी’चे रासेयो शिबिर
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनखास : यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा इंस्टिट्यूट आॅफ इंजीनियरींग अॅन्ड टेक्नॉलॉजीच्या (जेडीआयईटी) राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या विशेष शिबिराचे आयोजन नेर तालुक्यातील सोनखास येथे करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन बुधवारी अमोलकचंद महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य शंकरराव सांगळे, जेडीआयईटीचे प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रम अधिकारी प्रा.अभय राठोड, सोनखासच्या सरपंच सावित्री खाडे, माजी सभापती हेमंत कोटनाके, उपसरपंच बरखा कोटनाके, पोलीस पाटील दिनेश पारधी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनीता भोयर, मुख्याध्यापिका लता शंकरपुरे, शिक्षक प्रकाश वेळूकार, देवीदास झोड, सुभाष लोखंडे, विष्णु सूर, गणेश खाडे, ग्रामपंचायत सदस्य वर्षा लोखंडे, रत्ना येलके, अंकुश ठाकरे उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य शंकरराव सांगळे म्हणाले, रासेयो शिबिरातून देशासाठी आदर्श युवक घडवावा अशा शिबिराचे मानवी जीवनात महत्व आहे. प्राथमिक ते उच्च शिक्षणाचे महत्व त्यांनी यावेळी सांगितले. तर प्राचार्य डॉ. कोल्हटकर म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून समाजसेवा करण्याची संधी प्राप्त होते.
या आठ दिवसीय शिबिरात ग्राम स्वच्छता, आरोग्य तपासणी शिबिर, महिला बचत गटांना मार्गदर्शन, पर्यावरण जागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, श्रमदान, वन संवर्धन यासह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ३० जानेवारी रोजी या शिबिराचा समारोप होणार आहे.