‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांची आरएसजे कंपनीत निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 23:20 IST2017-10-27T23:20:45+5:302017-10-27T23:20:56+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची आरएसजे इन्स्पेक्शन सर्विसेस प्रा.लि. या नामांकित टेक्सटाईल कंपनीत निवड झाली आहे.

‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांची आरएसजे कंपनीत निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची आरएसजे इन्स्पेक्शन सर्विसेस प्रा.लि. या नामांकित टेक्सटाईल कंपनीत निवड झाली आहे. यात टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षाचे विद्यार्थी हर्षल सम्रीत व प्रियंका लोखंडे यांचा समावेश आहे. त्यांना दिल्ली व बेंगलोर या परिक्षेत्रासाठी नियुक्त करण्यात आले असून वार्षिक २.६४ लाख पॅकेज दिले आहे.
सदर कंपनी टेक्सटाईल जगतातील प्रमुख कंपन्यांची गुणवत्ता, नामांकन व तत्सम परिक्षण करून त्यांना प्रमाणित करण्याचे काम करते. पाचपेक्षा अधिक देशांमध्ये या कंपनीचे कार्यक्षेत्र आहे. भारतात सहा ठिकाणावरून कामकाज चालते. या कंपनीतर्फे जेडीआयईटीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी आरएसजेचे व्यवस्थापक (आॅपरेशन) वीरेंद्र इंगळे, युवराज जांभळे (व्यवस्थापक, क्वॉलिटी) उपस्थित होते. सर्वप्रथम टेक्नीकल टेस्ट घेण्यात आली. मुलाखतीद्वारे अंतिम निवड करण्यात आली. त्यांना मॅनेजमेंट इंजिनिअर ट्रेनी या पदावर नियुक्ती दिली आहे.