वेगळ्या विदर्भ राज्यासाठी जेलभरो आंदोलन; पोलिसांनी केले स्थानबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 13:31 IST2021-08-26T13:30:29+5:302021-08-26T13:31:06+5:30
यवतमाळ : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने गुरूवारी आर्णीरोडवर रास्तारोको व जेलभरो आंदोलन करून वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी करण्यात आली. ...

वेगळ्या विदर्भ राज्यासाठी जेलभरो आंदोलन; पोलिसांनी केले स्थानबद्ध
यवतमाळ : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने गुरूवारी आर्णीरोडवर रास्तारोको व जेलभरो आंदोलन करून वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी करण्यात आली. यावेळी वेगळ्या विदर्भ राज्याबाबत घोषणाबाजी करण्यात आली. अवधूतवाडी पोलीसांनी सात ते आठ विदर्भवाद्यांना स्थानबद्ध केले आहे.
वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी मागील अनेक वर्षापासून ही समिती लढा देत आहे. मात्र शासनाने त्यांची कुठलीच दखल घेतलेली नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आर्णीरोडवरील अभ्यंकर कन्या शाळेसमोर रस्तारोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समिती कडून स्वतंत्र विदर्भाचे राज्य करण्यात यावे, कोरोना काळातील वीज बिल माफ करून ते शासनाने भरावे, पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या.