यवतमाळात जगणे झाले कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 00:00 IST2019-06-04T23:59:26+5:302019-06-05T00:00:19+5:30
प्रचंड उन्हाच्या झळा, तीव्र पाणीटंचाई सोसणाऱ्या यवतमाळकरांना पावसाळाही प्रचंड तापदायक ठरणार आहे. विकास कामांच्या नावाखाली शहर जागोजागी खोदण्यात आले आहे. हे खड्डे अजूनही कायम आहे. पाऊस बरसल्यानंतर या ठिकाणावरून वाहने धावताना असंख्य अपघात घडण्याची शक्यता आहे.

यवतमाळात जगणे झाले कठीण
जागतिक पर्यावरण दिन
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : प्रचंड उन्हाच्या झळा, तीव्र पाणीटंचाई सोसणाऱ्या यवतमाळकरांना पावसाळाही प्रचंड तापदायक ठरणार आहे. विकास कामांच्या नावाखाली शहर जागोजागी खोदण्यात आले आहे. हे खड्डे अजूनही कायम आहे. पाऊस बरसल्यानंतर या ठिकाणावरून वाहने धावताना असंख्य अपघात घडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे दूषित पाण्यामुळे साथीचे आजार बळावण्याची दाट शक्यता आहे. भरीसभर म्हणजे लोकसंख्येच्या दुपटीहून वाहनांची संख्या झाल्याने वायू प्रदूषणही वाढले आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधी प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे यवतमाळात जगणे कठीण झाल्याची संतप्त भावना नागरिक व्यक्त करीत आहे.
सांडपाणी वाहून नेणाºया नाल्या जागोजागी तुंबल्या आहेत. शहरातील मोठे नाले पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात नाल्यांच्या स्वच्छतेची निविदा काढण्यात आल्या नाही. आचारसंहितेमुळे ही निविदा थांबली असल्याचे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शहराच्या कामकाजाबाबत नगरपालिका प्रशासनाकडून वेळोवेळी दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास येत आहे. यात पुन्हा आचारसंहितेमुळे भर पडली. नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वच्छतेचा आढावा घेतला. मात्र उपाययोजना सुरू झालेल्या नाहीत.
अखेर नगरपरिषदेला जाग
यवतमाळ शहरामध्ये विकास कामे करताना वृक्ष लागवड करण्यासाठी नगरपरिषदेने २० हजार वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे.
ही वृक्ष लागवड करताना शहरातील ३०० ओपन स्पेसमध्ये आणि रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली जाणार त्यासाठी ४० ते ५० लाखांचा खर्च अपेक्षित आहे.
पावसाळापूर्व सफाईचा विसर
शहरातील खोलगट वसाहतींमध्ये दरवर्षी पाणी साचून झोपडपट्टीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी नाल्याचा संपूर्ण प्रवाह वळविण्यात आला आहे. याच सोबत नाल्यांची स्वच्छताही पावसापूर्वी करणे अपेक्षित होते. मात्र निविदा उघडल्याच गेल्या नाही. या निविदा देण्यापूर्वी शहरात मोठा पाऊस झाला तर मोठ्या प्रमाणात खोलगट वसाहतीमध्ये पाणी शिरुन नुकसान होण्याची शक्यता आहे. नगराध्यक्षांचे संपूर्ण अधिकार गोठविल्यामुळे प्रशासन काय उपाययोजना करते, याची माहिती नगराध्यक्षांना मिळत नाही, यातून हा गोंधळ उडाला आहे.