आंबेडकरांचे तत्वज्ञान समाजात रुजविणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 23:32 IST2018-04-13T23:32:08+5:302018-04-13T23:32:08+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महापंडित व तत्ववेत्ते होते, त्यांनी समाजाच्या विकासासाठी अनेक ग्रंथ लिहिले. वर्तमानपत्रातून मोठे लिखाण केले. परंतु त्यांचे विचार आजही समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचले नाही.

आंबेडकरांचे तत्वज्ञान समाजात रुजविणे गरजेचे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महापंडित व तत्ववेत्ते होते, त्यांनी समाजाच्या विकासासाठी अनेक ग्रंथ लिहिले. वर्तमानपत्रातून मोठे लिखाण केले. परंतु त्यांचे विचार आजही समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचले नाही. त्यासाठी अनुयायांनी स्वत: बाबासाहेबांच्या साहित्याचे वाचन करून त्या प्रमाणे कृती करावी. देशाच्या विकासासाठी शाहू-फुले-आंबेडकरी तत्वज्ञान समाजात रुजविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आत्मभान संस्थेचे अध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी केले.
स्थानिक महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने आयोजित धम्मक्रांती प्रज्ञापर्वात ‘समकालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय वास्तव व आंबेडकरी कार्यकर्त्यांची भूमिका’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा होते. प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार देवानंद ढबाले, प्राचार्य संजीकुमार वाघमारे, प्रा. संजय करमनकर, ज्ञानेश्वर तडसे, संजय एडतकर, डॉ. हरिभाऊ फुपाटे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अशोकपार्क येथील समता महिला मंडळातर्फे बुद्ध वंदना सादर करण्यात आली. संचालन संघपाल आडोके यांनी तर आभार प्रज्ञा खिराडे यांनी मानले. कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रज्ञापर्व समितीचे अध्यक्ष सुरज वरठी, महेश खडसे, शीतलकुमार वानखेडे, मिलिंद हट्टेकर, डॉ. राजेश वाढवे, संदीप वाढवे आदी उपस्थित होते.