प्रतीक्षेतील पोलीस उमेदवारांना रुजू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:00 IST2020-06-14T05:00:00+5:302020-06-14T05:00:11+5:30
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पोलीस विभागावर कामाचा ताण वाढत आहे. काही पोलीस कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या विभागातील अनेकांनी वयाची ५५ ते ५८ वर्षे पूर्ण केली आहे. त्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका अधिक आहे. या परिस्थितीत महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातील २०१८ च्या प्रतीक्षा यादीतील सर्व उमेदवारांना पोलीस विभागामध्ये रुजू करून घेण्यात यावे, त्यामुळे पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होईल, असे असोसिएशनने निवेदनात म्हटले आहे.

प्रतीक्षेतील पोलीस उमेदवारांना रुजू करा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना पोलीस विभागात रुजू करून घ्या, अशी मागणी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनने केली आहे. यासाठी आमदार ख्वाजा बेग यांना निवेदन देण्यात आले.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पोलीस विभागावर कामाचा ताण वाढत आहे. काही पोलीस कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या विभागातील अनेकांनी वयाची ५५ ते ५८ वर्षे पूर्ण केली आहे. त्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका अधिक आहे. या परिस्थितीत महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातील २०१८ च्या प्रतीक्षा यादीतील सर्व उमेदवारांना पोलीस विभागामध्ये रुजू करून घेण्यात यावे, त्यामुळे पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होईल, असे असोसिएशनने निवेदनात म्हटले आहे.
लॉकडाऊनमुळे राज्यातील आर्थिक स्थिती ढासळली आहे. त्यामुळे नोकरभरतीची शक्यता कमी आहे. शिवाय प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची वयोमर्यादा संपत आहे. या सर्वांना देशसेवेची संधी द्यावी, असे निवेदनात नमूद केले आहे. असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अतिक अफजल शेख, उपाध्यक्ष ओंकार करंदीकर, जिल्हा सचिव संतोष वारे, शहर अध्यक्ष महेश गवई, उपाध्यक्ष देव मेश्राम, प्रसिद्धी प्रमुख सोहेल काझी, महिला अध्यक्ष सुवर्णाताई गायकवाड, उपाध्यक्ष लीलाताई मेश्राम, प्रतीक्षा यादीतील उमेदवार इमरान खान, विवेक माहुरकर, अनुप फुल्लके, शुभम गणवीर, सागर शिरसकर आदी उपस्थित होते.
पोलीस बॉईज असोसिएशनचा पुढाकार
पोलीस विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनी पोलीस बॉईज असोसिएशन स्थापन केली आहे. पोलीस कुटुंबातील सदस्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी या असोसिएशनचे कार्य सुरू आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाल्याने पोलिसांची ड्यूटी वाढली आहे. या परिस्थितीत साथ देण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे.