कळंबच्या कारखान्यात आंतरराज्यीय आरोपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 22:16 IST2018-09-15T22:15:52+5:302018-09-15T22:16:34+5:30
पोलिसांनी उघडकीस आणलेल्या व आतापर्यंत दीड कोटींपेक्षा अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केलेल्या बनावट खते व कीटकनाशके कारखान्यात आंतरराज्यीय आरोपींचा सहभाग असावा, असा संशय जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला.

कळंबच्या कारखान्यात आंतरराज्यीय आरोपी
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : पोलिसांनी उघडकीस आणलेल्या व आतापर्यंत दीड कोटींपेक्षा अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केलेल्या बनावट खते व कीटकनाशके कारखान्यात आंतरराज्यीय आरोपींचा सहभाग असावा, असा संशय जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला.
एसपी राज कुमार यांनी शनिवारी येथे भेट देऊन त्या गोदाम व कारखान्याची पाहणी केली. तपासाबाबत पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. दोन दिवसांपूर्वी हा कारखाना उघडकीस आणला गेला. शनिवारी त्याच्या गोदामावरही धाड घातली गेली. या प्रकरणात कुणाला काही माहिती असेल तर त्यांनी ती ९९२३८१४२४२ या क्रमांकावर द्यावी व पोलिसांना सहकार्य करावे, त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन एम. राज कुमार यांनी यावेळी केले.