शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 06:00 AM2020-01-29T06:00:00+5:302020-01-29T06:00:14+5:30

नोकरीत लागताना जिल्हा परिषदेच्या बहुतांश शिक्षकांना परजिल्ह्यात रुजू व्हावे लागते. ठराविक कलावधीपर्यंत त्यांना ‘आउट ऑफ डिस्ट्रिक्ट’ नोकरी करावीच लागते. अनेक शिक्षकांना कुटुंबापासून दूर राहावे लागते. अशा शिक्षकांना स्वजिल्ह्यात येण्यासाठी पूर्वी पदाधिकाऱ्यांकडे वाशिला लावावा लागत होता. त्यानंतर आर्थिक देवाण-घेवाणीशिवाय पसंतीचे गावही मिळणे कठीण होते. मात्र ग्रामविकास विभागाने गेल्या दोन वर्षांपासून आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया ऑनलाईन केली आहे.

Inter-district transfer opportunities for teachers | शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीची संधी

शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीची संधी

Next
ठळक मुद्देचौथा टप्पा सुरू : जिल्हा परिषदेने सुरू केली प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना पुन्हा आंतरजिल्हा बदलीची संधी प्राप्त झाली आहे. ऑनलाईन प्रक्रियेतून गेल्या दोन वर्षात हजारो शिक्षकांना स्वजिल्ह्यात जाता आले आहे. तीन टप्पे यशस्वीपणे राबविल्यानंतर आता जिल्हा परिषदेने बदलीच्या चौथ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
नोकरीत लागताना जिल्हा परिषदेच्या बहुतांश शिक्षकांना परजिल्ह्यात रुजू व्हावे लागते. ठराविक कलावधीपर्यंत त्यांना ‘आउट ऑफ डिस्ट्रिक्ट’ नोकरी करावीच लागते. अनेक शिक्षकांना कुटुंबापासून दूर राहावे लागते. अशा शिक्षकांना स्वजिल्ह्यात येण्यासाठी पूर्वी पदाधिकाऱ्यांकडे वाशिला लावावा लागत होता. त्यानंतर आर्थिक देवाण-घेवाणीशिवाय पसंतीचे गावही मिळणे कठीण होते. मात्र ग्रामविकास विभागाने गेल्या दोन वर्षांपासून आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. त्यामुळे कोणत्याही वशिल्याशिवाय हजारो शिक्षकांना आपल्या जिल्ह्यात जाता आले.
तीन टप्प्यात ही प्रक्रिया यशस्वी झाली. आता तिसऱ्या टप्प्यासाठी जिल्हा परिषदेने १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविले आहे.

बदलीसाठी स्वतंत्र पोर्टल
आंतरजिल्हा बदलीसाठी यंदा ग्रामविकास विभागाने स्वतंत्र ‘ट्रान्सफर पोर्टल’ सुरू केले आहे. या पोर्टलवर १० फेब्रुवारीपर्यंत शिक्षकांना स्वत: ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. त्यासाठी शिक्षकाला स्वत:चा स्टाफ आयडी वापरून लॉगीन करावे लागणार आहे. त्यासोबत गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अभिप्रायासह सेवापुस्तिकेची सत्यप्रत जोडावी लागणार आहे.

Web Title: Inter-district transfer opportunities for teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.