शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

बंडखोरी भाजपमध्ये, डोकेदुखी शिवसेनेला!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2019 7:35 AM

भाजपची बंडखोरी। तार्इंपुढे आव्हान, कुणबी मतांचे विभाजन, बंजारा समाज एकवटतोय

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व शिवसेना यांच्यात थेट सामना आहे. शिवसेनेला मात्र भाजपच्या बंडखोरीचा मोठा फटका बसण्याची चिन्हे आहे. याच वेळी या दोन्ही प्रमुख उमेदवारांमध्ये आपल्या समाजाची मते विभागली जाणार आहे. या मतदारसंघात २४ उमेदवार रिंगणात आहे. शिवसेनेच्या भावनाताई गवळी पाचव्यांदा रिंगणात आहेत. तर माणिकराव ठाकरे १५ वर्षानंतर पुढच्या दाराने निवडणूक लढवित आहेत. काँग्रेस त्यांना नवा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करीत आहे. मात्र माणिकरावांनी जिल्ह्याच्या राजकारणात गटबाजीला खतपाणी घातले, पक्ष वाढविला नाही, जिल्ह्याला काहीच दिले नाही असा आरोपही होत आहे.

सलग चार टर्म झाल्यामुळे भावना गवळी यांच्या विरोधात वातावरण आहे. त्यांच्या नावाला सुरुवातीपासूनच विरोध झाला. भाजपच नव्हे तर सेनेतील नेत्यांनीही हा विरोध रेटला. खुद्द मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात मध्यस्थी करावी लागली. आजही युतीतील प्रमुख नेते भावनातार्इंच्या विरोधात आहेत. त्यामुळे तार्इंना त्यांची मनधरणी करावी लागत आहे. ही नाराज नेते मंडळी भाजपचे बंडखोर पी.बी. आडे यांना ताकद देत आहे. बंजारा समाजाच्या मतांवर या बंडखोराची मदार आहे. मात्र या अपक्षाची बंडखोरी शिवसेनेसाठी अधिक नुकसानकारक ठरणारी आहे. काँग्रेस व शिवसेनेने एकाच समाजाचे दोन उमेदवार दिल्याने मतांचे विभाजन निश्चित आहे. आतापर्यंत तार्इंसोबत दिसणारा कुणबी समाज या वेळी पर्यायाचा विचार करतो आहे. दीर्घ अनुभवी राजकारणी व चार टर्मच्या खासदार असा दिग्गजांचा सामना येथे रंगतो आहे. माणिकरावांपुढेही पक्षांतर्गत गटबाजी थोपविण्याचे मोठे आव्हान आहे. राष्ट्रवादीतीलही एक गट माणिकरावांच्या विरोधात आहे. काँग्रेसची मदार परंपरागत मतदारांवर आहे. तर शिवसेनेला हिंदुत्व व मोदींना मानणाऱ्या मतदारांची मोठी मदत होणार आहे. या मतदारसंघात भाजपच्या बंडखोराला समाज बांधवांची मोठी ताकद मिळाल्यास काँग्रेसचा सामना या बंडखोरासोबत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वंचित आघाडीचा उमेदवार बंजारा समाजाची मते खेचू शकतो. 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गरिबांना वार्षिक ७२ हजार रुपये देण्याची केलेली घोषणा नागरिकांना मनापासून आवडली आहे. त्याच वेळी मोदी व भाजपा सरकारची केवळ आश्वासने आता जनतेने चांगलीच ओळखली आहे. त्यामुळे मतदार यावेळी भाजपाला नाकारुन काँग्रेसला पसंती देईल.- माणिकराव ठाकरे, काँग्रेसमी २० वर्षे खासदार असली तरी माझ्याविरोधात कोणताही फॅक्टर नाही. केंद्राचा विकास निधी मोठ्या प्रमाणात आणण्यावर माझा भर राहिला आहे. रेल्वे प्रकल्पांवर माझा सर्वाधिक जोर राहिला. माझा हा विकासच मला या निवडणुकीत पाचव्यांदा निवडून आणण्यास महत्वपूर्ण ठरणार आहे.- भावना गवळी, शिवसेना

टॅग्स :yavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकManikrao Thackreyमाणिकराव ठाकरे