शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

‘मिशन चक्रवती’ची केंद्रीय पथकाकडून पाहणी

By admin | Updated: June 4, 2016 02:10 IST

लोकसहभागातून होत असलेल्या ‘मिशन चक्रवती’च्या कामाची पाहणी शुक्रवारी केंद्रीय पथकाने केली. प्रत्यक्ष पाहणी करून झालेल्या

लोकसहभागाचे कौतुक : चापर्डा गावातील प्रश्न जाणले, नागरिकांनी मांडल्या पथकाकडे विविध समस्याकळंब : लोकसहभागातून होत असलेल्या ‘मिशन चक्रवती’च्या कामाची पाहणी शुक्रवारी केंद्रीय पथकाने केली. प्रत्यक्ष पाहणी करून झालेल्या आणि होणाऱ्या कामाची माहिती घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या कामाची माहिती देण्यात येईल, असा विश्वासही या पथकाने दिला.दिल्ली येथील नीती आयोगाचे सदस्य तथा पथक प्रमुख रामानंद, ग्रामीण विकास विभागाचे अव्वर सचिव राम वर्मा, केंद्रीय विद्युत प्राधिकरणचे सचिव जे.के. राठोड, जलसंधारण विभागाचे उपसंचालक मिलिंद पानपाटील, भारतीय खाद्य निगमचे सहायक प्रबंधक एम.एम. बोऱ्हाडे, मदत व पुनर्वसन उपसचिव आत्राम यांच्यासह वरिष्ठ मंडळी यावेळी उपस्थित होती. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार ंयांनी लोकसहभागातून केलेल्या या कामाची माहिती पथकाला दिली. चक्रवती नदीचे पात्र अरुंद व उथळ असल्याने पाणी साचत नव्हते. भीषण पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागायचा. आता नदी खोल करण्यात आली, पात्र रुंद करण्यात आले. ठिकठिकाणी भूमिगत बंधारे निर्माण करून पाणी साठवण क्षमता वाढविण्यात आली. येणाऱ्या काही वर्षात कळंब शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, अशी माहिती यावेळी देण्यात आली. पथक प्रमुख रामानंद यांनी हा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर टाकण्यात येणार असल्याचे सांगितले. पथकाची चापर्डा गावाला भेटकेंद्रीय पथकाने शुक्रवारी चापर्डा गावला भेट दिली. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांशी चर्चा करुन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. कोणती पिके घेतली जातात, पीक होते की नाही, शेतीमध्ये लावलेला पैसा निघतो की नाही याची माहिती पथकाने घेतली. नागरिकांनी आपले प्रश्न मांडले. यावेळी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गायकवाड, तहसीलदार संजय होटे, गटविकास अधिकारी डॉ.मनोहर नाल्हे, सहायक गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता मनोहर शहारे, तालुका कृषी अधिकारी के.बी. आठवले, पशुधन विकास अधिकारी रवींद्र मांडेकर, कृषी अधिकारी किशोर अंबरकर, पंकज बरडे आदी उपस्थित होते. कामठवाडा गावलाही पथकाची भेट नियोजित होती. गावकरी सकाळपासूनच वाट पाहात होते. ऐनवेळी पथकाने उशीर झाल्याचे कारण देत कामठवाडा गावला जाण्याचे टाळले. त्यामुळे तेथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)