महिनाभरात पाच हजारांवर नमुन्यांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 05:00 AM2020-07-07T05:00:00+5:302020-07-07T05:00:33+5:30

यवतमाळ जिल्ह्यासह वाशिम व बुलडाणा येथून आलेल्या नमुन्यांची तपासणी केली जाते. २४ तासात दीडशे नमुने तपासणीची क्षमता या लॅबमध्ये आहे. सहा तंत्रज्ञ व प्राध्यापकांच्या अहोरात्र परिश्रमामुळे हे शक्य होत आहे. सूक्ष्मजीवशास्त्र विभागाकडून व्हायरॉलॉजी लॅब चालविण्यात येते. सध्या कोरोना तपासणीवरच पूर्ण फोकस आहे.

Inspection of over five thousand samples in a month | महिनाभरात पाच हजारांवर नमुन्यांची तपासणी

महिनाभरात पाच हजारांवर नमुन्यांची तपासणी

Next
ठळक मुद्दे‘मेडिकल’ची कोरोना लॅब : २४ तासात दीडशे नमुने, वाशिम, बुलडाण्याचाही भार

सुरेंद्र राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जून महिन्यात कोरोना लॅब कार्यान्वित झाली. या लॅबमध्ये महिनाभरात एकूण पाच हजार नमुन्यांची यशस्वी तपासणी करण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्ह्यासह वाशिम व बुलडाणा येथून आलेल्या नमुन्यांची तपासणी केली जाते. २४ तासात दीडशे नमुने तपासणीची क्षमता या लॅबमध्ये आहे. सहा तंत्रज्ञ व प्राध्यापकांच्या अहोरात्र परिश्रमामुळे हे शक्य होत आहे. सूक्ष्मजीवशास्त्र विभागाकडून व्हायरॉलॉजी लॅब चालविण्यात येते. सध्या कोरोना तपासणीवरच पूर्ण फोकस आहे. याशिवाय इतरही विषाणू संसर्गाची तपासणी या लॅबमध्ये करणे शक्य आहे. दिवसरात्र कोरोना लॅब चालू असल्याने रुग्णांचा शोध घेणे सहज शक्य होत आहे. संशयित रुग्णाचा किमान २४ तासातच त्याचा अहवाल मिळत असल्याने वैद्यकीय यंत्रणेला उपचाराचे नियोजन करताना मोठी मदत होत आहे.
यापूर्वी नागपूर व अकोला येथे स्वॅब तपासणीला पाठविले जात होते. त्याचा अहवाल येण्यास विलंब लागत होता. आता ती प्रतीक्षा संपली आहे. उलट वाशिम व बुलडाणा या जिल्ह्यातील रुग्णांचे स्वॅब तपासण्यात येत आहे. विभाग प्रमुख डॉ. विवेक गुजर यांच्या नियंत्रणात या लॅबचे कामकाज सुरू आहे.

३ जुलैपर्यंत ३३९ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह
कोरोना लॅब ३ जूनला सुरू झाली. तपासलेल्या पाच हजार नमुन्यांमध्ये सर्वाधिक यवतमाळातील नमुन्यांचा समावेश आहे. त्यानंतर वाशिम व बुलडाणाचा क्रमांक लागतो. एकूण ३३९ नमुने पॉझिटिव्ह आले. यात यवतमाळचे १९७, वाशिम १०१, बुलडाणा ४१ अशी आकडेवारी आहे.

Web Title: Inspection of over five thousand samples in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.