शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांत आरटीओंकडून 142 खासगी प्रवासी वाहनांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2022 22:29 IST

वायूवेग पथकात तरबेज असलेल्या एकाच वाहन निरीक्षकावर खर्च सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली. पथकातील इतर अधिकाऱ्यांनी कारवाया केल्या, मात्र ट्रॅव्हल्स वगळून उर्वरित प्रवासी वाहनांवर कारवाई झाली. ट्रॅव्हल्स व्यवसायाचा पुरेपूर अनुभव याशिवाय ट्रॅव्हल्स पॉईंटवर पूर्णवेळ बैठक, त्यातून दैनंदिन वसुलीवर बारीक लक्ष ठेवले जात होते. महिन्याकाठीचा हिशेब नियमित जात असल्याने त्या जागेवर मागील नऊ महिन्यांत सहा वेळा एकाच निरीक्षकाला संधी देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आरटीओतील एकूणच कारभाराची पद्धत उघड होत आहे. सहा महिन्यांत आरटीओंनी जिल्ह्यातील १४२ खासगी प्रवासी वाहनांची तपासणी केली. त्यात केवळ ३३ वाहने दोषी दाखविण्यात आली तर सहा वाहने ताब्यात घेतली. १६ वाहनांच्या केसेसचा निपटारा केला. त्यात तीन लाख ३० हजार रुपये दंड वसूल झाला व एका वाहनाचा टॅक्स थकीत असल्याने तो एक लाख २० हजार वसूल केला. या प्रवासी वाहनांची कारवाई करतानाही  वायूवेग पथकाने आखडता हात घेतल्याचे दिसून येते. वायूवेग पथकात तरबेज असलेल्या एकाच वाहन निरीक्षकावर खर्च सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली. पथकातील इतर अधिकाऱ्यांनी कारवाया केल्या, मात्र ट्रॅव्हल्स वगळून उर्वरित प्रवासी वाहनांवर कारवाई झाली. ट्रॅव्हल्स व्यवसायाचा पुरेपूर अनुभव याशिवाय ट्रॅव्हल्स पॉईंटवर पूर्णवेळ बैठक, त्यातून दैनंदिन वसुलीवर बारीक लक्ष ठेवले जात होते. महिन्याकाठीचा हिशेब नियमित जात असल्याने त्या जागेवर मागील नऊ महिन्यांत सहा वेळा एकाच निरीक्षकाला संधी देण्यात आली आहे. मुळात ड्युटी लावताना रोटेशन पद्धतीचा वापर होणे आवश्यक आहे. जेणेकरून कुणीही एका ठिकाणी गुंतून हितसंबंध निर्माण होऊ नये हा या मागचा उद्देश आहे. याकडे गेल्या काही दिवसांपासून दुर्लक्ष होत असल्याचे आरटीओ वर्तुळातूनच ऐकायला मिळत आहे. अवैध प्रवासी वाहनांवर कारवाई करताना ट्रॅव्हल्सला सोयीस्करपणे वगळण्यात आले. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत जिल्हाभरात चालणाऱ्या १४२ प्रवासी वाहनांची तपासणी केली. जिल्हाभरातील व्यावासयिक प्रवासी वाहनांची संख्या पाहता ही कारवाई केवळ सोपस्कार असल्याचे स्पष्ट होते. 

नागालॅन्ड, अरुणाचल पासिंगच्या ट्रॅव्हल्स जिल्ह्यात - धक्कादायक प्रकार आता उघडकीस येवू लागला आहे. अनेक दिवसांपासून जिल्ह्यात नागालॅन्ड, अरुणाचल, पॉन्डेचरी येथील आरटीओ पासिंग असलेल्या ट्रॅव्हल्स लोकल प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जात आहे. वायूवेग पथक-१ ने कारवाई केल्यानंतर हा प्रकार चार दिवसापूर्वी उघड झाला. अशा सहा ट्रॅव्हल्स जप्त केल्या आहेत. त्यातील दोन यवतमाळात व पुसदमध्ये चार ट्रॅव्हल्स आहेत.

खासगी बसमधून प्रवाशांसोबत मालाची वाहतूक - खासगी बसेसमधून महानगरांकडे प्रवाशांसोबतच मालाची वाहतूक केली जाते. या बसेसमध्ये दुचाकी, कापडाचे गठ्ठे यासह इतर अनेक वस्तू लादल्या जातात. याकरिता बसमध्ये स्वतंत्र कप्पेच बनविण्यात आले आहे. ही बस प्रवाशांसाठी की माल वाहतुकीसाठी असा प्रश्नही उपस्थित होतो. याचा धोका असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. - ट्रॅव्हल्स व्यवसायात भागीदार असलेल्याला जबाबदारी दिल्याने कुठल्याच ट्रॅव्हल्सची तपासणी किंवा ठोस कारवाई झाली नाही. बिनबोभाटपणे ट्रॅव्हल्समधून प्रवासी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नेले जातात. याकडे हितसंबंधातूनच दुर्लक्ष होत असल्याचे आता उघड झाले आहे. वायूवेग पथकाच्या कारवाईने राज्याबाहेरील पासिंगच्या बसेसही हाती लागल्या आहेत. 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस