बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 22:59 IST2017-10-28T22:59:02+5:302017-10-28T22:59:20+5:30
येथील बसस्थानक परिसरात वाहन चोरी, पाकीटमारी असे प्रकार सर्रास घडत आहेत. यावर आळा घालण्यासाठी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे .....

बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही लावा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील बसस्थानक परिसरात वाहन चोरी, पाकीटमारी असे प्रकार सर्रास घडत आहेत. यावर आळा घालण्यासाठी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे तसेच सुरक्षा रक्षकाचीही व्यवस्था वाढविण्यात यावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे करण्यात आली आहे.
या मागणीबाबत राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रकांना निवेदन देण्यात आले आहे. बसस्थानक परिसरात जिल्हाभरातील प्रवाशी येत असतात. या प्रवाशांची बॅग, पैसे, दागिने व वाहने चोरीस जाण्याच्या घटना दिवसेन्दिवस वाढत आहेत. केवळ प्रवाशांचेच नव्हेतर महामंडळाच्या कर्मचाºयांचे वाहनही चोरीस जात आहेत. या गंभीर बाबीवर आळा घालण्यासाठी बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यांची योग्य ती देखभाल करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. तसेच या परिसरात सुरक्षा रक्षकांच्या संख्येतही वाढ केल्यास प्रवाशांच्या सुरक्षेची सोय होईल. येत्या १५ दिवसात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले गेले नाहीतर प्रहारच्या वतीने पुढील पाऊल उचलण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी संतोष दांडगे, चंदन हातागडे, आशीष तुपटकर, सिद्धार्थ तेलतुंबडे, इमरान खान, कुणाल ठकणे, विक्की नाडे, रुपेश सरडे आदी उपस्थित होते.