ससाणीत नावीन्यपूर्ण विज्ञान प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST2019-12-17T05:00:00+5:302019-12-17T05:00:14+5:30
या प्रदर्शनात पांढुर्णा केंद्रातील १८ शाळांनी सहभाग घेतला. त्यांचे साहित्य प्रदर्शनात मांडण्यात आले. पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी, अशा दोन गटात विभागून साहित्याची मांडणी करण्यात आली होती. जी.डी. कैटिकवर यांच्याहस्ते उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पंकज आवारी होते. परीक्षक म्हणून जी.आर. बंगळे, मानव लढे यांनी काम पाहिले. केंद्र प्रमुख एस.पी. लाकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

ससाणीत नावीन्यपूर्ण विज्ञान प्रदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : तालुक्यातील ससाणी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा, या उद्देशाने केंद्रस्तरीय नावीन्यपूर्ण विज्ञान साहित्य प्रदर्शन घेण्यात आले.
या प्रदर्शनात पांढुर्णा केंद्रातील १८ शाळांनी सहभाग घेतला. त्यांचे साहित्य प्रदर्शनात मांडण्यात आले. पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी, अशा दोन गटात विभागून साहित्याची मांडणी करण्यात आली होती. जी.डी. कैटिकवर यांच्याहस्ते उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पंकज आवारी होते. परीक्षक म्हणून जी.आर. बंगळे, मानव लढे यांनी काम पाहिले. केंद्र प्रमुख एस.पी. लाकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या केंद्र्रस्तरीय विज्ञान प्रदर्शनात पहिली ते पाचवीच्या गटातून ससाणी, तिवसाळा, कुºहाड आणि सहावी ते आठवीच्या गटातून ससाणी, किन्ही व पांढुर्णा खु शाळांनी अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला. विजेत्या शाळेच्या साहित्याला स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रदर्शनाला सरपंच राजू आडे, विठ्ठल राठोड, युवराज आवारी, बबन राऊत, दीपक राठोड, अर्चना मनोहर, सोनाली गेडाम, चेतना पंधरे, किशोर मानकर उपस्थित होते. संचालन प्रितम देवतळे, तर आभार राजेंद्र कुळसंगे यांनी मानले. मुख्याध्यापक किशोर मानकर, गणेश सिरस्कार, भारत राठोड, विलास किरनापुर आदींनी सहकार्य केले.