शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

दारव्हा ‘एमआयडीसी’तील उद्योग आले धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 05:00 IST

व्यावसायिक सलीम सोलंकी यांनी याबाबत उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना निवेदन दिले. ईगल इन्स्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या ब्लास्टींगमुळेच हा प्रकार घडत असल्याचा आरोप असून निवेदनाद्वारे त्यांनी कारवाईची मागणी केली आहे. येथील एमआयडीसीमध्ये सलीम सोलंकी यांची सोलंकी जिनिंग अ‍ॅण्ड प्रेसिंग फॅक्टरी आणि महाराष्ट्र ऑइल अँड बेसन इंडस्ट्री हे दोन उद्योग सुरु आहे.

ठळक मुद्देव्यावसायिकांची तक्रार : ईगलच्या ब्लास्टींगमुळे इमारतींना तडे, कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : येथील गिट्टी खदानमधील ब्लास्टींगमुळे काही नगरातील घरांना हादरे बसल्याची घटना घडल्यानंतर आता एमआयडीसीमधील इमारतींनासुध्दा तडे गेल्याची तक्रार करण्यात आली. त्यामुळे या परिसरातील उद्योग, व्यवसाय धोक्यात आले आहे.व्यावसायिक सलीम सोलंकी यांनी याबाबत उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना निवेदन दिले. ईगल इन्स्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या ब्लास्टींगमुळेच हा प्रकार घडत असल्याचा आरोप असून निवेदनाद्वारे त्यांनी कारवाईची मागणी केली आहे. येथील एमआयडीसीमध्ये सलीम सोलंकी यांची सोलंकी जिनिंग अ‍ॅण्ड प्रेसिंग फॅक्टरी आणि महाराष्ट्र ऑइल अँड बेसन इंडस्ट्री हे दोन उद्योग सुरु आहे. एमआयडीसीपासून काही अंतरावर गिट्टी खदान आहे. त्याठिकाणी ईगल इन्फ्रास्ट्रक्चर या रस्ता बांधकाम कंपनीने गिट्टी खदान सुरु केली. तेथून मोठ्या प्रमाणात गिट्टी काढल्या जाते. त्याकरिता शासनाने ठरवून दिलेल्या नियमाच्या जास्त प्रमाणात ब्लास्टिंग करण्यात येत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या ब्लास्टींगमुळे फॅक्टरीची इमारत व मशीनचे नुकसान होत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. इमारतींच्या भिंतीला मोठ मोठे तडे गेले असून सदर स्टोन क्रेशरमुळे भविष्यात मोठी हानी होऊ शकते.सोलंकी यांच्यासह एमआयडीसीत इतरही मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय टाकण्यात आले आहे. त्यांचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सदर स्टोन क्रेशरचे ब्लास्टिंग भूकंपासारखे आवाज करून होतात. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.यापूर्वी व्रुंदावन शिक्षक काँलनी, कृषी कॉलनी परिसरातील नागरिकांनी प्रचंड प्रमाणात होत असल्यामुळे ब्लास्टींगमुळे घरांना हादरे बसण्यासोबतच येथील रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर आता या ब्लास्टींगमुळे उद्योग, व्यवसाय धोक्यात आल्याची तक्रार आहे. आधीच कोरोनाच्या संकटामुळे व्यवसायात प्रचंड घाटा सहन करावा लागत आहे. त्यातच या प्रकारामुळे फॅक्टरी बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर स्टोन क्रेशरवर तात्काळ कारवाईची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.प्रशासनाकडून कारवाईची प्रतीक्षाबागवाडी शिवारातील गिट्टी खदानमधील ब्लास्टींगमुळे शहरातील कृषी कॉलनी, शिक्षक कॉलनी परिसरातील घरांना तडे गेल्याची तक्रार यापूर्वी करण्यात आली होती. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या ब्लास्टिंगच्या आवाजामुळे येथील वयोवृद्ध, लहान बालके तसेच रहिवाशांच्या आरोग्यावरसुद्धा परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यासोबत आता खदान लगतच्या एमआयडीसीतील उद्योग, व्यवसायावरदेखील परिणाम होत असल्याची तक्रार करण्यात आली. परंतु याउपरही प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे गिट्टी खदानवर कधी कारवाई होणार या प्रतीक्षेत नागरिक व व्यवसायिक आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसीBlastस्फोट