तीनही कोरोनाबाधितांच्या प्रकृतीत सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 06:00 IST2020-03-19T06:00:00+5:302020-03-19T06:00:13+5:30

दुबईवरून यवतमाळात आलेल्या तीन कुटुंबातील नऊ सदस्यापैकी तिघांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे तपासणीत सिद्ध झाले. त्यामुळे त्यांना यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पहिल्यांदा यातील दोघांचे नमुने पॉझिटीव्ह आले. दुसऱ्यांदा नमुन्याच्या तपासणीत तिसऱ्या व्यक्तीलाही कोरोनाचा संसर्ग असल्याचे स्पष्ट झाले.

Improvement in the nature of all three coronaviruses | तीनही कोरोनाबाधितांच्या प्रकृतीत सुधारणा

तीनही कोरोनाबाधितांच्या प्रकृतीत सुधारणा

ठळक मुद्देतिसऱ्यांदा नमुने पाठविले : नव्याने चार संशयित शासकीय रुग्णालयात

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले तीन रुग्ण यवतमाळात आढळले. या रुग्णांची प्रकृती झपाट्याने सुधारत असल्याचे वैद्यकीय सूत्राकडून सांगण्यात आले. या रुग्णांचे विविध नमुने तपासणीसाठी तिसऱ्यांदा नागपूर येथे पाठविले आहे. याचा अहवाल आल्यानंतरच ते पूर्णत: बरे झाल्याची घोषणा केली जाणार आहे. असे असले तरी नव्याने दाट लक्षणे असलेले चार कोरोना संशयितांना मेडिकलच्या आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दुबईवरून यवतमाळात आलेल्या तीन कुटुंबातील नऊ सदस्यापैकी तिघांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे तपासणीत सिद्ध झाले. त्यामुळे त्यांना यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पहिल्यांदा यातील दोघांचे नमुने पॉझिटीव्ह आले. दुसऱ्यांदा नमुन्याच्या तपासणीत तिसऱ्या व्यक्तीलाही कोरोनाचा संसर्ग असल्याचे स्पष्ट झाले. या रुग्णांवर मागील आठ दिवसांपासून उपचार सुरू आहे. त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली आहे. ते पूर्णत: बरे झाले की नाही याची पडताळणी करण्यासाठी तिसºयांदा नमुने नागपूर प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.
मेडिकलच्या आयसोलेशन वार्डात दुबई व मक्का येथून आलेल्या दोघांना लक्षणे दिसत असल्याने दाखल केले आहे. तर दोन व्यक्ती कोरोना बाधित रुग्णांच्या थेट संपर्कात असल्याने त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. मेडिकलच्या आयसोलेशन वार्डात तीन कोरोना रुग्ण व चार संशयित उपचार घेत आहे. मेडिकलची संपूर्ण टीम अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांच्या नेतृत्वात काम करीत आहे. रुग्ण व संशयितांवर २४ तास लक्ष असून त्यांची सुश्रृषा सुरू असल्याचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी सांगितले.

कोरोनाग्रस्तांचे कपडे धुण्याला नकार
मेडिकलच्या आयसोलेशन वार्डात कोरोनाग्रस्त रुग्ण व संशयित उपचार घेत आहे. मेडिकलमध्ये यांत्रिक लॉन्ड्री बंद आहे. त्यामुळे हातानेच रुग्णांचे कपडे व चादर धुवावी लागते. कोरोनाग्रस्तांची कपडे धुण्यास मेडिकलच्या धोब्याने नकार दिला. मात्र अधिष्ठाता डॉ.मिलिंद कांबळे यांनी संबंधितांशी चर्चा केली. एका लिक्वीडमध्ये रात्रभर संसर्ग प्रतिबंध वार्डातील चादर व कपडे भिजवून निर्र्जंतूक केले जातात. त्यानंतरच हे कपडे धुण्यासाठी लॉन्ड्रीला पाठविले जाते, असे स्पष्ट केले. यातून गैरसमज दूर झाला असून कपडे धुण्याचे काम पूर्ववत सुरू असल्याचे अधिष्ठातांनी सांगितले.

होम कॉरेनटाईन केलेल्या व्यक्तींवर पोलिसांचा वॉच
जिल्ह्यात ८८ संशयितांना होम कॉरेनटाईन केले आहे. काही ठिकाणी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद मिळत नसल्याने होम कॉरेनटाईन केलेल्यांवर पोलिसांचा वॉच राहणार आहे. त्याकरिता प्रत्येक तालुक्यात एक पोलीस उपनिरीक्षक व चार शिपाई तैनात केले असून दर दिवसाला आढावा घेणार आहे. घराबाहेर पडणाºयावर फौजदारी कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे.

कोरोना प्रतिबंध समितीचा विस्तार
कोरोना प्रतिबंधासाठी प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र समिती तयार केली. आता या समितीचा विस्तार केला असून तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह संबंधित पोलीस ठाण्याचे ठाणेदार, पोलीस उपनिरीक्षक व पाच शिपाई या समितीत काम करणार आहे. याशिवाय सर्व उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंते यांच्यावर प्रत्येकी एका तालुक्याची जबाबदारी सोपविली आहे. जिल्हा परिषद सीईओंच्या नियंत्रणात ग्रामीण भाग आहे. तर अपर जिल्हाधिकारी शहरी भागावर नियंत्रण ठेवणार आहे. त्यासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्राधिकृत केले आहे.

Web Title: Improvement in the nature of all three coronaviruses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.