वनउद्यानालगतच्या बहिरम टेकडी परिसरात सागवानाची अवैध कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 06:00 IST2020-01-19T06:00:00+5:302020-01-19T06:00:13+5:30
जांब रोडवर वनविभागाचे मोठे उद्यान आहे. त्याला लागूनच वनविभागाने आता विश्रामगृहही बांधले आहे. या भागात वनविभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियमित ये-जा असते. मात्र रस्त्याच्या कडेला असलेल्या वाघाडी नदीच्या काठावर सागाचे डेरेदार वृक्ष बहरले आहे. आता या वृक्षांना तस्करांनी लक्ष्य केले असून दिवसाढवळ्याच त्याची कटाई केली जात आहे. घनदाट भागात जाऊन सागाचे झाड तोडले जाते.

वनउद्यानालगतच्या बहिरम टेकडी परिसरात सागवानाची अवैध कत्तल
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जंगलातील मौल्यवान सागवान चोरट्यांच्या निशाण्यावर आहे. वनविभागाची यंत्रणा जंगल सुरक्षित असल्याच्या वल्गना करत असली तरी प्रत्यक्ष स्थिती अतिशय गंभीर आहे. नियमित गस्त होत नसल्याने शिवाय आर्थिक व्यवहारातच वनविभागाच्या यंत्रणेचे अधिक स्वारस्य वाढल्याने जंगलातील साग धोक्यात आला आहे. यवतमाळ शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या जांब रोड परिसरातील जंगलात भरदिवसाच सागाची कत्तल होत आहे.
जांब रोडवर वनविभागाचे मोठे उद्यान आहे. त्याला लागूनच वनविभागाने आता विश्रामगृहही बांधले आहे. या भागात वनविभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियमित ये-जा असते. मात्र रस्त्याच्या कडेला असलेल्या वाघाडी नदीच्या काठावर सागाचे डेरेदार वृक्ष बहरले आहे. आता या वृक्षांना तस्करांनी लक्ष्य केले असून दिवसाढवळ्याच त्याची कटाई केली जात आहे. घनदाट भागात जाऊन सागाचे झाड तोडले जाते. नंतर त्याच्यावर पाळत ठेऊन ते पूर्णत: वाळल्यानंतर त्याची पद्धतशीरपणे विल्हेवाट लावली जाते. शहराच्या लागून असलेले जंगल तस्करांसाठी पर्वणीच ठरत आहे. या जंगलात बºयाच ठिकाणी सागाचे झाड दिसेनासे झालेले आहे. जलतन तोडणारे स्वत:च्या मालकीचे जंगल असल्यासारखेच वावरताना दिसतात. वनविभागाच्या मुख्य कार्यालयापासून पाच किलोमीटर अंतरावरचे जंगल सुरक्षित नसल्याने इतर जंगलाची काय अवस्था आहे याची कल्पना येते. वाघाडी नदी पुनरूज्जीवनासाठी रॅली फॉर रिव्हर हा कार्यक्रम राबविला जात आहे. त्यासाठी ईशा फाऊंडेशनचे स्वयंसेवक गावागावात जाऊन जनजागृती करत आहेत. तर दुसरीकडे वनविभागाच्या दुर्लक्षाने नदीकाठच्या जगलात असलेली वनसंपदा धोक्यात आली आहे.