शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

अवैध कीटकनाशक कंपन्या, विक्रेत्यांवर ‘मकोका’सारखे गुन्हे, शेतक-यांचे जीव घेणा-यांना धडा शिकवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 7:19 AM

यवतमाळ : कीटकनाशक फवारणीने विषबाधा होऊन शेतक-यांचे झालेले मृत्यू अतिशय गंभीर बाब असल्याचे स्पष्ट करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अवैध कीटकनाशकांचे उत्पादन करणा-या कंपन्या तसेच विक्रेत्यांविरुद्ध संघटित गुन्हेगारी स्वरूपाचे (मकोका) गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

यवतमाळ : कीटकनाशक फवारणीने विषबाधा होऊन शेतक-यांचे झालेले मृत्यू अतिशय गंभीर बाब असल्याचे स्पष्ट करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अवैध कीटकनाशकांचे उत्पादन करणा-या कंपन्या तसेच विक्रेत्यांविरुद्ध संघटित गुन्हेगारी स्वरूपाचे (मकोका) गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीच्या विषबाधेने २१ शेतकरी, शेतमजुरांचे मृत्यू तर आठशेवर बाधित झाले. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणाची अतिरिक्त मुख्य गृहसचिव आणि विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) चौकशी केली जात आहे. नफा कमावण्यासाठी शेतकरी, शेतमजुरांचे जीव घेणाºयांंना राज्य शासन योग्य धडा शिकवेल. यात कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.बोगस बियाणे, कीटकनाशके इतर राज्यांतून जिल्ह्यात अनधिकृतरीत्या येत असेल, तर त्याचीही चौकशी करून जबाबदारी निश्चित करा, असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, केंद्र शासनाच्या कीटकनाशकासंबंधी कायद्यामध्ये राज्य सरकारतर्फे काही सुधारणा करण्यात येतील. यवतमाळ जिल्ह्याची शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा ही ओळख पुसण्यासाठी प्रशासनाने दक्ष राहावे. जिल्हाधिकारी, जिप मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांसह संपूर्ण यंत्रणेने फिल्डवर जाऊन काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. त्याआधी मुख्यमंत्र्यांनी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन विषबाधित शेतकºयांची विचारपूस केली. आढावा बैठकीला पालकमंत्री मदन येरावार, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, आमदार डॉ. अशोक उईके, आमदार राजेंद्र नजरधने, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाºयांच्या रिक्त पदांचाही आढावा घेतला आणि रिक्त पदे तत्काळ भरण्याचा आदेश दिला. डॉक्टरांना नियुक्तीपत्रे देतानाच त्यांच्याकडून कालावधी पूर्ण केल्याशिवाय नोकरी न सोडण्याचे हमीपत्र लिहून घ्यावे व त्याचा भंग करणाºयांना नंतर कोणत्याही सासकीय नोकरीसाठी अपात्र मानले जावे, असेही त्यांनी सांगितले.>दौºयातून शिवसेनेच्या मंत्र्यांना वगळले : मुख्यमंत्र्यांच्या यवतमाळ दौºयातून वगळल्याबद्दल शिवसेना नेते तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना नाराजी व्यक्त केली. शिवसेनेला मिळणाºया या दुय्यम वागणुकीचा मुद्दा वरपर्यंत लावून धरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी या दौºयाबाबत प्रचंड गोपनीयता बाळगल्याबद्दल शिवसेना नेते तथा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी कडाडून टीका केली. मुख्यमंत्र्यांना शेतकºयांची एवढी भीती वाटते काय, असा सवाल त्यांनी केला. -वृत्त/४>दोन कंपन्यांवर गुन्हाकीटकनाशक फवारणीतून विषबाधेचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने कृषी साहित्यविक्रेते आणि कंपनींवर कारवाईचा बडगा उगारला. यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत नऊ कृषी साहित्य विक्रेते आणि दोन कीटकनाशक उत्पादक कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील पाच कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले असून विविध कंपन्यांची ३१८ कीटकनाशके विक्री बंदीचे आदेश प्रशासनाने दिले आहे.>कर्जमाफीसाठी आधार आवश्यक : आॅनलाइन प्रक्रियेमुळे शेतकरी कर्जमाफी खºया लाभार्थ्यांनाच मिळणार आहे. कर्जमाफीसाठी आता आधारकार्ड आवश्यक आहे. आधारकार्ड नसेल तर लाभ मिळणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस