शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

पशुवैद्यकीय चिकित्सालये दुर्लक्षित

By admin | Updated: June 9, 2014 23:52 IST

तालुक्यातील अनेक पशू वैद्यकीय चिकित्सालये दुर्लक्षित असून याकडे कुणाचेही लक्ष नाही. परिणामी या पशुचिकित्सालयांची अतिशय दुर्दशा झाली आहे.

पांढरकवडा : तालुक्यातील अनेक पशू वैद्यकीय चिकित्सालये दुर्लक्षित असून याकडे कुणाचेही लक्ष नाही. परिणामी या पशुचिकित्सालयांची अतिशय दुर्दशा झाली आहे.शासनाने लाखो रूपये खर्चून बांधलेल्या या पशू चिकित्सालयांचा पशू पालकांना पाहिजे तसा लाभही होताना दिसत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पशु संगोपन ही आज काळाची  गरज बनली आहे. पशुसंवर्धनाकरिता पशु चिकित्सलयांचे आधुनिकीकरण होणे अतिशय आवश्यक झाले आहे. तालुक्यात पशुवैद्यकीय चिकित्सालयांची   असलेली कमतरता, अत्याधुनिक सुविधेचा अभाव, जनजागृतीची कमतरता, वैद्यकीय तज्ज्ञांची रिक्त पदे, या सर्व दुर्लक्षित बाबींमुळे पशू संख्येतही कमालीची घट झाली आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून प्रामुख्याने पशू संवर्धनाकडे पाहिले जाते. पशू संवर्धनामुळेच  पश्‍चिम महाराष्ट्र विकसित झाला आहे. शासनाच्या पशुसंवर्धनासाठी अनेक योजना असल्या, तरी या योजनांची योग्य ती अंमलबजावणीच होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. तालुक्यात तीन प्रथम श्रेणी पशू वैद्यकीय दवाखाने व १0 द्वितीय श्रेणी दवाखाने, असे एकूण १३ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. यामध्ये एका फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा समावेश आहे. याशिवाय पांढरकवडा शहरात शासकीय तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय आहे. परंतु वैद्यकीय अधिकारी व   कर्मचार्‍यांची कमतरता तसेच इतर सोयी-सुविधांचा अभाव, यामुळे या पशु चिकित्सलयांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. पाटणबोरी व धारणा येथील पशू  वैद्यकीय दवाखाना तसेच फिरता पशू वैद्यकीय दवाखाना, अशा तीनही ठिकाणच्या पशुधन विकास अधिकार्‍यांच्या जागा कित्येक दिवसांपासून रिक्तच आहे. विशेष म्हणजे हे तिनही पशु वैद्यकीय दवाखाने श्रेणी-१ मधील आहे. तेथे परिचरांच्या भरवशावर कारभार सुरु आहे.अनेक ठिकाणी औषधांचा ठणठणाट असून सुविधांचा अभाव आहे. परंतु याकडे लक्ष द्यायला कुणालाही सवड नाही. अडणी, रुंझा, अर्ली, चनाखा, आकोली(बु.), मोहदा, सायखेड, सुन्ना, चालबर्डी व पहापळ या ठिकाणी श्रेणी-२ मधील पशू वैद्यकीय दवाखाने असून, हे दवाखाने अद्याप आहे त्याच अवस्थेत आहे. दवाखान्याच्या केवळ इमारती झाल्या, परंतु अत्याधुनिक सुविधाच नाही. पशुसंवर्धन विभागाने वैद्यकीय अधिकार्‍यांच्या नियुक्तीसोबतच पशुवैद्यकीय दवाखान्यांचे आधुनिकीकरण व बळकटीकरण करणे आवश्यक झाले आहे.पांढरकवडा येथे शासकीय तालुका लघु पशू वैद्यकीय सर्व चिकित्सालय हे अतिशय जीर्ण झालेल्या इमारतीत सुरु आहे. ही इमारत कधीही कोसळू शकते, अशी परिस्थिती आहे. हे पशुचिकित्सालय पूर्वी नगरपरिषदेकडे होते. २५ मे २00४ च्या शासन निर्णयानुसार नगरपरिषदेचे पशू दवाखाने तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय दर्जाचे करण्यात आले. या चिकित्सलयाचा कारभार पशू संवर्धन विभागाकडून पाहिला जातो. या दवाखान्यात दर महिन्याला ५५0 ते ६00 पशूंची तपासणी होते. वंध्यत्व शिबिरे तसेच कृती शिबिरे घेतली जातात. चौखुरी, घटसर्प, एकटांग्या, कुपस्या आदी रोगांचे लसीकरण रुग्णालयात व कार्यक्षेत्रातील गावात करण्यात येते. परंतु नगरपरिषदेकडे असलेला हा पशू दवाखाना शासनाकडे हस्तांतरीत झाल्यानंतरही अतिशय जीर्ण इमारतीत आहे. (तालुका प्रतिनिधी)