आंबेडकरी श्रमिक साहित्य संमेलनात वैचारिक मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 11:34 PM2018-02-18T23:34:21+5:302018-02-18T23:34:39+5:30

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कृत तथा आंबेडकरी साहित्य व कला अकादमीच्या वतीने दुसरे आंबेडकरी श्रमिक साहित्य संमेलन यवतमाळात होऊ घातले आहे.

Ideal banquet for the Ambedkar Workers' Literature Meet | आंबेडकरी श्रमिक साहित्य संमेलनात वैचारिक मेजवानी

आंबेडकरी श्रमिक साहित्य संमेलनात वैचारिक मेजवानी

Next
ठळक मुद्देयवतमाळात आयोजन : २४ व २५ फेब्रुवारीला भरगच्च कार्यक्रम

ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कृत तथा आंबेडकरी साहित्य व कला अकादमीच्या वतीने दुसरे आंबेडकरी श्रमिक साहित्य संमेलन यवतमाळात होऊ घातले आहे. २४ आणि २५ फेब्रुवारीला होणाऱ्या संमेलनात वैचारिक कार्यक्रमांची भरगच्च मेजवानी मिळेल, अशी माहिती रविवारी आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा परिषद बचत भवनात हे साहित्य संमेलन होणार आहे. प्रसिद्ध कवी प्रसेनजित ताकसांडे हे संमेलनाध्यक्ष असून माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. उद्घाटनप्रसंगी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य वामनराव तेलंग, डॉ. सुधीर पाठक, आमदार ख्वाजा बेग, नगराध्यक्ष कांचनताई चौधरी, समाजकल्याण सभापती प्रज्ञा भूमकाळे, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, आरोग्य सभापती दिनेश चिंडाले, बाजार समिती सभापती रवी ढोक, मजूर फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विलास महाजन, भीमशक्ती संघटनेचे अविनाश भगत, कास्ट्राईबचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ भवरे, डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू पाटील भोयर, कवी हेमंतकुमार कांबळे, प्रा. डॉ. अशोक कांबळे आदी उपस्थित राहणार आहे. बळी खैरे व संजय ओरके यांच्या पोस्टर पोएट्रीचे उद्घाटनही यावेळी होणार आहे.
दुपारी नारायण जाधव येळगावकर यांचा आंबेडकरी काव्यधारा कार्यक्रम, तर सायंकाळी प्रा. विलास भवरे यांच्या अध्यक्षतेखाली महाकविसंमेलन होणार आहे. रविवारी डॉ. वामन गवई यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादात नूतन माळवी, प्रा. माधव सरकुंडे, अ‍ॅड. संदेश भालेकर, दशरथ मडावी, डॉ. अनिल काळबांडे सहभागी होणार आहेत. दुसºया सत्रात झुंझार कार्यकर्ते जिंदा भगत यांची प्रकट मुलाखत सतीश राणा घेणार आहेत. अ‍ॅड. सलीम शहा यांच्या न्यायासनाखाली श्रमिक लोकन्यायालय होणार आहे. त्यात श्रमिक पत्रकार संघाचे बल्लू भागवते, प्रजासत्ताक शिक्षक परिषदेचे संजय गुजर, नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे महेश जोशी, अनुसूचित जाती जमाती संघटनांच्या परिसंघाचे एम. के. कोडापे, कास्ट्राईब रूग्णालयीन कर्मचारी संघटनेच्या वनमाला राऊत, मोलकरीण संघटनेच्या ममता भालेराव आदींवर खटला चालविण्यात येणार आहे. श्रमिकांची बाजू अधिवक्ता म्हणून संजय बोरकर व सुनिल पुनवटकर मांडणार आहे.
पत्रकार परिषदेला स्वागताध्यक्ष संजय मानकर, आनंद गायकवाड, गोपीचंद कांबळे, बळी खैरे, कवडूजी नगराळे, सुनिल भेले, सुमेध ठमके, संजय ढोले, संदीप नगराळे, सुनिल वासनिक, डॉ. सुभाष जमधाडे, डॉ. साहेबराव कदम, डॉ. युवराज मानकर, भास्कर चव्हाण आदी उपस्थित होते.

Web Title: Ideal banquet for the Ambedkar Workers' Literature Meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.