शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

अवनीच्या शिकारीसाठी महाराज बागेतील दुसऱ्या वाघिणीचे मूत्रच ठरले उपयोगी! बछड्यांचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 12:31 IST

१३ निष्पापांचे बळी घेणारी अवनी वाघिण तब्बल दीड महिन्यांपासून वन विभागाच्या पथकाला चकवा देत होती. प्रशिक्षीत हत्ती, श्वान पथक, पॅरा ग्लायडर यांनाही तिचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर अनुभवी अधिका-यांनी क्लुप्ती योजली.

- नरेश मानकरपांढरकवडा (यवतमाळ)  - १३ निष्पापांचे बळी घेणारी अवनी वाघिण तब्बल दीड महिन्यांपासून वन विभागाच्या पथकाला चकवा देत होती. प्रशिक्षीत हत्ती, श्वान पथक, पॅरा ग्लायडर यांनाही तिचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर अनुभवी अधिका-यांनी क्लुप्ती योजली. नागपूरच्या महाराज बागेतून दुस-या वाघिणीचे मूत्र आणून जंगलात शिंपडले. कशालाच दाद न देणारी अवनी निसर्गनियमानुसार त्या वासावर आली आणि शार्पशुटरनी तिचा वेध घेतला.नरभक्षक झालेल्या अवनीला जेरबंद करण्याची मोहिम युद्धस्तरावर सुरू होती. मध्यप्रदेशातून हत्ती आणले, प्रसिद्ध शार्पशुटर बोलविण्यात आले. हवाई शोध घेण्यासाठी पॅराग्लाईडर आणण्यात आले. इटालीयन कुत्रेसुद्धा आणण्यात आले होते. शेवटी वाघिणीचे मूत्रच उपयोगी ठरले. मुत्राच्या वासामुळे कधीकधी ती झुडूपाबाहेर येत होती. कॅमेरामध्येही ती ट्रॅप झाली. तिच्या पाऊलखुणाही आढळून आल्या होत्या. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास वाघीण बोराटी जंगल परिसरात दुस-या वाघिणीच्या मूत्राचा शोध घेत वाघडोटा पुलाजवळ आली आणि शार्पशुटर असगर अली खान याने नेम धरून गोळी झाडली व ती धारातीर्थी पडली. पांढरकवडा वनविभागाच्या उपवनसंरक्षक के. अभर्णा यांना भ्रमणध्वनीद्वारे ही माहिती देण्यात आली. पहाटे ४.३० वाजेपर्यंत तब्बल पाच तास पंचनामा करून मृतदेह नागपूर येथे शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला.वाघिणीला बेशुद्ध करण्याचा भरपूर प्रयत्न केला गेला. परंतु ती चवताळून पथकावर चाल करून आली. त्यामुळे तिला ठार केल्याशिवाय पर्याय नव्हता, असे पांढरकवडा विभागाचे उपवनसंरक्षक के.एस.अभर्णा यांनी सांगितले.बेशुद्धीचा प्रयत्न झालाच नाहीवाघिणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झाला की नाही, की तिच्यावर सरळ गोळ्याच घालून ठार मारण्यात आले, याबाबत संभ्रम आहे.वाघिणीच्या मृत शरिरात बेशुद्ध करण्यासाठी वापरण्यात आलेला डार्ट आढळून आला. परंतु तो मृत झाल्यावर तिच्या शरिरात खुपसण्यात आल्याचा दावा वन्यजीव प्रेमींनी केला आहे.तब्बल दीड महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर ठार मारण्यात आलेल्या नरभक्षक वाघिणीचे ११ महिन्यांचे दोन बछडे अद्यापही शोधपथकाच्या दृष्टीस पडले नाही. त्यांना कसे जेरबंद करायचे हा गहन प्रश्न आता वनविभागासमोर निर्माण झाला आहे.आई दिसली नाही, तर हे बछडे अधिक आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त असून त्यातून पुन्हा मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Avani Tigressअवनी वाघीणwildlifeवन्यजीवMaharashtraमहाराष्ट्रTigerवाघ