शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

शेतकऱ्यावर निसर्गासोबतच प्रशासनाची अवकृपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:00 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांना निसर्गाचा लहरीपणा ही आता नित्याचीच बाब झाली आहे. परंतु शेतकरी निसर्गाच्या लहरीपणाला न डगमगता शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून शेती आधुनिकतेकडे नेत उत्पन्न वाढीचा प्रयत्न करतानाचे सकारात्मक चित्र तालुक्यात दिसत आहे. मात्र शेतकºयांच्या या जीवघेण्या प्रयत्नांना मानवी यंत्रणा सुरूंग लावत असल्याच्या आरोप आता शेतकऱ्यांकडून होत आहे आणि त्यासाठी शेतकरी जी कारणे सांगत आहे, ती पटण्यासारखी आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची सगळीकडून कुचंबना, शेती उद्योग अडचणीत, आत्महत्या वाढण्याची भिती

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : शेतकरीनिसर्गाच्या लहरीपणाचा सामना करून शेती उद्योगाचा शिवधनुष्य पेलण्याचा आटोकात प्रयत्न करीत असताना आता प्रशासकीय यंत्रणेच्या लहरीपणाने शेती उद्योग डबघाईस येण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येत वाढ होण्याची भिती वर्तविल्या जात आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांना निसर्गाचा लहरीपणा ही आता नित्याचीच बाब झाली आहे. परंतु शेतकरी निसर्गाच्या लहरीपणाला न डगमगता शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून शेती आधुनिकतेकडे नेत उत्पन्न वाढीचा प्रयत्न करतानाचे सकारात्मक चित्र तालुक्यात दिसत आहे. मात्र शेतकºयांच्या या जीवघेण्या प्रयत्नांना मानवी यंत्रणा सुरूंग लावत असल्याच्या आरोप आता शेतकऱ्यांकडून होत आहे आणि त्यासाठी शेतकरी जी कारणे सांगत आहे, ती पटण्यासारखी आहे. तालुक्यातील जवळपास दोन हजार शेतकरी राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेस पात्र ठरले. परंतु यातील ३५० शेतकऱ्यांना योजनेस पात्र असूनही लाभ मिळाला नाही, तर अनेक शेतकरी थकीत कर्जदार असूनही त्यांची नावे कर्जमाफी यादीतून सुटली आहे तर ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला, अशा शेतकºयांना बँका नव्याने कर्ज देताना अडवणुकीची भूमिका घेतानाचे चित्र आहे.बँकांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्याचा आत्मविश्वास कमजोर होत आहे. पिकांच्या वाढीसाठी व चांगल्या उत्पादनासाठी शेतकºयांना युरियाची गरज आहे. पण गेल्या चार महिन्यापासून युरियाचा काळाबाजार सुरू आहे. २६८ रूपयाची बॅग आज ४०० रूपयाला शेतकऱ्याला खरेदी करावी लागत आहे. अजूनही खताची टंचाई आहे. कृषीमंत्री दादा भुसे जिल्ह्यात आल्यानंतर मुबलक युरियाची घोषणा केली. पण ही घोषणाही वांझोटी निघाली. फवारणी औषधामध्येही शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. खताच्या नावावर शेतकऱ्यांना लुबाडले जात आहे.एकाच औषधाची किंमत दुकान बदलताच बदलत आहे. त्यामुळे एमआरपी कायदा कुठे गेला, असा प्रश्न निर्माण होत आहे.विशेष म्हणजे या कृषी केंद्रातून शेतकऱ्यांना चढ्या भावाने बियाणांची व्रिकी केली जात असली तरी या कृषी केंद्राची संबंधित विभागाकडून साधी चौकशीसुद्धा केली जात नाही. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी गप्पच राहत असल्याचे दिसून येते.सहा महिन्यांत २३ आत्महत्यालॉकडाऊन सुरू झाल्यापासून म्हणजे गेल्या सहा महिन्यात तालुक्यात तब्बल २३ नागरिकांनी आत्महत्या केल्या आहे. या सर्व आत्महत्या शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून केल्या नसल्या तरी या सर्व आत्महत्या शेतकरी कुटुंबातील आहे. शेतकऱ्यांची सर्वत्र होणारी कुचंबना यातून वाढलेली व्यसनाधिनता. घरात होणारा वादंग, यातून कुटुंबात सतत वाद चालत असल्याने या आत्महत्या होत आहे. या सर्व आत्महत्या आर्थिक अडचणीतून झाल्या आहे, एवढे मात्र निश्चित.शेतकरी आत्महत्येत तालुका अव्वलआदिवासीबहुल म्हणून ओळख असलेला मारेगाव तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण मोठे आहे. २००५ मध्ये राहुल गांधी यांनी तालुक्यातील जळका येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त बांदुरकर कुटुंबियांची भेट घेऊन विधवा कलावती बांदुरकर यांचे दु:ख लोकसभेत मांडून शेतकरी आत्महत्येचा प्रश्न राष्ट्रीयस्तरावर पोहोचविला होता. मात्र चार वर्षात तालुक्यात ५७ आत्महत्या झाल्या. शेतकरी आत्महत्या म्हनून या सर्व आत्महत्या गनल्या गेल्या.

टॅग्स :FarmerशेतकरीNatureनिसर्ग