डाॅक्टरला दोन कोटीला फसविणाऱ्या संदेशचे आणखी किती ‘हनी ट्रॅप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 05:00 IST2021-09-05T05:00:00+5:302021-09-05T05:00:17+5:30

सोशल मीडियावर अनन्नया सिंग या नावाने फेसबुक, इन्स्टाग्रामवर बनावट खाते काढले. याच माध्यमातून त्याची डाॅक्टरशी ओळख झाली. सुरुवातीला हाय, हॅलो झाल्यानंतर डाॅक्टरशी जवळीकता निर्माण करून संदेशने आपण मोठे उद्योगपती असल्याचे भासविले. डाॅक्टरही भावनिक झाले होते. ते दररोज अनन्नया सिंग अर्थात संदेशशी व्हाॅट्सॲपवरूनही गप्पा मारत होते. एकेदिवशी संदेशने बहिणीच्या अपहरणाचा बनाव करून डाॅक्टरकडे तब्बल दोन कोटींची मागणी केली.

How many more 'honey traps' of the message that deceived the doctor for two crores? | डाॅक्टरला दोन कोटीला फसविणाऱ्या संदेशचे आणखी किती ‘हनी ट्रॅप’

डाॅक्टरला दोन कोटीला फसविणाऱ्या संदेशचे आणखी किती ‘हनी ट्रॅप’

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दिल्ली येथील एका नामांकित डाॅक्टरला महिला असल्याचे भासवून हनी ट्रॅपमध्ये अडकवित दोन कोटींचा गंडा घालणाऱ्या संदेशचे अवघे बारावीपर्यंतचे शिक्षण झालेले आहे. मात्र, इंग्रजी माध्यमात शिकलेला असल्याने डाॅक्टरांशी तो प्रभावीपणे संवाद साधू शकला. या संदेश मानकरने अशा पद्धतीच्या हनी ट्रॅपमध्ये आणखी किती जणांना फसविले आहे, याचा शोध आता पोलिसांनी सुरू केला आहे. 
यवतमाळ शहरातील अरुणोदय सोसायटीतील २१ वर्षीय संदेश अनिल मानकर या तरुणाने महिला असल्याचे भासवून दिल्ली येथील डाॅक्टरला तब्बल दोन कोटींचा गंडा घातला. इंग्रजी माध्यमातून इयत्ता बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या संदेशच्या वडिलांचे निधन झालेले आहे, तर आई वेगळी राहत असल्याने अरुणोदय सोसायटीत एका भाड्याच्या घरात संदेश राहत आहे. येथूनच त्याने सोशल मीडियावर अनन्नया सिंग या नावाने फेसबुक, इन्स्टाग्रामवर बनावट खाते काढले. याच माध्यमातून त्याची डाॅक्टरशी ओळख झाली. सुरुवातीला हाय, हॅलो झाल्यानंतर डाॅक्टरशी जवळीकता निर्माण करून संदेशने आपण मोठे उद्योगपती असल्याचे भासविले. डाॅक्टरही भावनिक झाले होते. ते दररोज अनन्नया सिंग अर्थात संदेशशी व्हाॅट्सॲपवरूनही गप्पा मारत होते. एकेदिवशी संदेशने बहिणीच्या अपहरणाचा बनाव करून डाॅक्टरकडे तब्बल दोन कोटींची मागणी केली. विशेष म्हणजे, थेट दिल्लीहून यवतमाळमध्ये येत डाॅक्टरांनी शहरातील एकविरा हाॅटेलबाहेर रात्री १० च्या सुमारास अनन्नया सिंग यांनी सांगितल्यानुसार समर नामक तरुणाकडे पैसे सुपूर्द केले. आता हा समर म्हणजे कोण, असा प्रश्न पोलिसांपुढे उपस्थित झाला आहे. समर म्हणजेच संदेश तर नव्हे ना, की संदेशबरोबर आणखी कोणी साथीदार या प्रकरणात आहे, याचाही शोध आता सुरू केला आहे. पोलीस अधीक्षकांनी तात्काळ तपासाबद्दल ५० हजारांचे बक्षीस पोलीस पथकाला जाहीर केले आहे. 

कोण बोलत होते महिलेच्या आवाजात ?

- संदेशने महिला असल्याचे भासवून डाॅक्टरांना कोट्यवधींना गंडविले. डाॅक्टरांशी मोबाईलवर महिलेच्या आवाजात बोलणारा संदेश होता की आणखी कोणी महिला या प्रकरणात आहे, याचा शोधही सुरू आहे. दोन कोटीला फसविणाऱ्या संदेशने अनेकांना गंडविल्याचा संशय आहे. 

 

Web Title: How many more 'honey traps' of the message that deceived the doctor for two crores?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.