वाढोना बाजार येथे घराला आग; पाच ते सहा लाख रुपयाचे नुकसान
By सुरेंद्र राऊत | Updated: May 16, 2023 17:06 IST2023-05-16T17:05:56+5:302023-05-16T17:06:11+5:30
आगीत जवळपास पाच ते सहा लाख रुपयाचे नुकसान झाले.

वाढोना बाजार येथे घराला आग; पाच ते सहा लाख रुपयाचे नुकसान
राळेगाव (यवतमाळ) : तालुक्यातील वाढोना बाजार येथे मंगळवारी दुपारी दोन वाजता अचानक लागलेल्या आगीत जावेद खा पठाण यांच्या घर आणि डेकोरेशनचे सामान जळून खाक झाले.
आगीत जवळपास पाच ते सहा लाख रुपयाचे नुकसान झाले. आगीची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धावाधाव करून ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या परिसरात बरीच घरी एकमेकांना लागून असल्यामुळे थोडा जरी उशीर झाला असता तरी आणखी घराचे नुकसान होण्याची शक्यता होती. घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ. अशोक उईके यांनी घटनास्थळी भेट दिली.