अभियंत्याचे घर बनले आंबटशौकिनांचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST2019-12-26T05:00:00+5:302019-12-26T05:00:02+5:30

अडगळीत पडलेल्या या घरामध्ये त्यांचा वावर असतो. अभियंत्याकडून या निवासस्थानाचा वापर केला जात नाही. त्यामुळे देखभाल दुरुस्तीअभावी हा बंगला अडगळीत पडला आहे. अमरावती-यवतमाळ मार्गावर असलेल्या या निवासस्थानाचा वापर केला जात नाही. भर वस्तीत हे घर असताना वापराविषयी ना दिसून येते.

The house of the engineer becomes a hub of amateurs | अभियंत्याचे घर बनले आंबटशौकिनांचा अड्डा

अभियंत्याचे घर बनले आंबटशौकिनांचा अड्डा

ठळक मुद्देनेरमध्ये गैरप्रकार : शासकीय निवासस्थान अडगळीत

लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यासाठी येथे बांधण्यात आलेले निवासस्थान आंबटशौकिनांचा अड्डा बनले आहे. दारूडे, गांजा शौकिनांनी याठिकाणी बस्तान मांडले आहे. अडगळीत पडलेल्या या घरामध्ये त्यांचा वावर असतो.
अभियंत्याकडून या निवासस्थानाचा वापर केला जात नाही. त्यामुळे देखभाल दुरुस्तीअभावी हा बंगला अडगळीत पडला आहे. अमरावती-यवतमाळ मार्गावर असलेल्या या निवासस्थानाचा वापर केला जात नाही. भर वस्तीत हे घर असताना वापराविषयी ना दिसून येते.
उपयोगात नसलेल्या या इमारतीचा वापर संध्याकाळनंतर दारू पिण्यासाठी, गांजा ओढण्यासाठी केला जात आहे. हा प्रकार एवढ्यावरच थांबत नाही तर अनैतिक प्रकारही याठिकाणी घडत आहेत. परिसरातील नागरिकांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावरच चाल केली जाते. या प्रकारामुळे शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुढील काळातील धोके टाळण्यासाठी उपाययोजना कराव्या, अशी मागणी या परिसरातील नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

कुलूपबंद जाळी तयार करून घर सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र आंबटशौकिनांकडून वारंवार तोडफोड होते. आता इमारत पाडण्याची परवानगी वरिष्ठांकडे मागितली जाणार आहे.
- भूपेश कथलकर,
सहायक अभियंता, सा.बां. विभाग, नेर

Web Title: The house of the engineer becomes a hub of amateurs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.