शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

आंबेडकरी कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 23:12 IST

आंबेडकरी चळवळीत प्राणपणाला लावून काम करणारा कार्यकर्ता कायम उपेक्षित राहिला. जीवन समर्पित केलेल्या या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यासाठी आंबेडकरी साहित्य व कला अकादमी आणि यवतमाळ जिल्हा नागरी सन्मान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान सोहळा आयोजित केला आहे.

ठळक मुद्देराज्यातील पहिला उपक्रम : आंबेडकरी साहित्य व कला अकादमीचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आंबेडकरी चळवळीत प्राणपणाला लावून काम करणारा कार्यकर्ता कायम उपेक्षित राहिला. जीवन समर्पित केलेल्या या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यासाठी आंबेडकरी साहित्य व कला अकादमी आणि यवतमाळ जिल्हा नागरी सन्मान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान सोहळा आयोजित केला आहे. रमाबाई आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून रविवारी मेडीकल चौकातील बचत भवन सभागृहात हा सोहळा होणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रपरिषदेत दिली.जिल्ह्यातील आंबेडकरी कार्यकर्त्यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला जाणार आहे. आर्थिक मदतही देण्याचे प्रयोजन आहे. या सोहळ्याला उद्घाटक म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या प्राचार्य कमलताई गवई आहे. प्रमुख अतिथी म्हणून नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पुरणचंद्र मेश्राम, समता सैनिक दलाचे कॅप्टन अशोक खनाडे, भारिप-बहुजन महासंघाचे नेते चंदन तेलंग, सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष डॉ. दिलीप घावडे, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते इ.मो. नारनवरे, वर्धा जिल्हा परिषद सदस्य विजय आगलावे, ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब सोनोने, बापूरावजी धुळे, अर्जूनराव लोखंडे, पी.डी. डबले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. भूमीहिनांचा सत्याग्रह, जंगल सत्याग्रह, मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळावे यासाठी सुमारे १७ वर्ष चाललेले नामांतर आंदोलन, रिडल्स् प्रकरण, खैरलांजीची घटना या सर्वांचा प्रत्यक्ष अनुभव कार्यकर्ते आपल्या मनोगतातून विशद करणार असल्याचे आनंद गायकवाड यांनी सांगितले.या कार्यक्रमाला मोहन भोयर, सिद्धार्थ भवरे, प्रकाश भस्मे, सदाशिव भालेराव, संजय मानकर, नालंदा भरणे, विजय डांगे, महेंद्र मानकर, अ‍ॅड. रामदास राऊत, दीपक नगराळे, प्रेम हनवते, डॉ. अनिल काळबांडे, अविनाश भगत, डॉ. विश्वजित कांबळे, अशोककुमार भगत, विमल मुजमुले, उत्तमराव गायकवाड, संजय साठे, लोपामुद्रा महाजन हे निमंत्रित पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक आनंद गायकवाड, नवनीत महाजन, गोपिचंद कांबळे, कवडू नगराळे, प्रा. विलास भवरे, संजय बोरकर, राहुल सोनोने, रत्नपाल डोफे, धर्मपाल माने, दिलीप वाघमारे, डॉ. सुभाष जमधाडे, डॉ. साहेबराव कदम, प्रा. संदीप नगराळे, आनंद डोंगरे, महेंद्र गजभिये, नितीन पानतावणे, संदेश तुपसुंदरे, विनोद नागदेवते, देवानंद शेळके, सुमेध ठमके, आनंद धवने, सुनिल वासनिक, बापूराव रंगारी, भीमसिंह चव्हाण, संजय ढोले, धनंजय गायकवाड, भीमराव जांभरुनकर, दीपक भवरे आदींनी केले आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर