कोपरा येथे बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 21:49 IST2019-05-27T21:48:52+5:302019-05-27T21:49:04+5:30

घरी कोणी नसल्याची संधी साधत बारावीच्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना कोपरा (पुनर्वसन) येथे सोमवारी सकाळी ९.३० च्या सुमारास घडली. चेतना सदानंद शिंगाडे असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.

Honduras sues suicide in Kopra | कोपरा येथे बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

कोपरा येथे बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
बाभूळगाव : घरी कोणी नसल्याची संधी साधत बारावीच्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना कोपरा (पुनर्वसन) येथे सोमवारी सकाळी ९.३० च्या सुमारास घडली. चेतना सदानंद शिंगाडे असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.
आई, वडील व कुटुंबातील सदस्य मजुरीसाठी गेले होते. घरात असलेल्या दोन लहान बहिणी बाहेर जाताच चेतना हिने घरातच गळफास लावला. तिच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. प्रकरणी बाभूळगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास जमादार किसन मंदिलकर करीत आहे. चेतना हिने नानीबाई घारफळकर विद्यालयातून बारावीची परीक्षा दिली होती. अभ्यासात हुशार असलेल्या चेतनाने हे टोकाचे पाऊल का उचलले असावे, याविषयी तर्कवितर्क लावले जात आहे.

Web Title: Honduras sues suicide in Kopra