हैद्राबादकडे जाणारे सागवान ट्रक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:27 IST2017-08-07T00:26:51+5:302017-08-07T00:27:14+5:30
परवानगीपेक्षा जादा सागवान हैद्राबादकडे जात असल्याच्या संशयावरून रविवारी जोडमोहा येथील वनपरिक्षेत्र अधिकाºयांनी दोन ट्रक ताब्यात घेतले.

हैद्राबादकडे जाणारे सागवान ट्रक ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : परवानगीपेक्षा जादा सागवान हैद्राबादकडे जात असल्याच्या संशयावरून रविवारी जोडमोहा येथील वनपरिक्षेत्र अधिकाºयांनी दोन ट्रक ताब्यात घेतले. त्यातील सागवानाची मोजणी केली जात आहे.
कळंब तालुक्यातील पार्डी नकटी येथील काही शेतकºयांच्या शेतातील सागवान झाडे किनवट येथील कंत्राटदाराने खरेदी केले. त्यासाठी त्याने परवाना काढला. मात्र वाहतूक परवाना आणि प्रत्यक्षातील ट्रकमध्ये असलेल्या सागवानात मोठी तफावत असल्याची माहिती वनाधिकाºयांना मिळाली. त्यावरून रविवारी सकाळी जोडमोहा येथील वनकर्मचाºयांनी दोन ट्रक (क्र.एम.एच.२६-एच.७०४२ आणि एम.एच.२६-एच.५५९७) ताब्यात घेतले. या दोन्ही ट्रकमध्ये वाहतूक परवान्यावर नोंद असलेलेच सागवान आहे की त्यापेक्षा जादा सागवान आहे. याची खातरजमा केली जात आहे.
सध्या सागवान तस्करीला उधाण आले आहे. या ट्रकमधून सागवानाची तस्करी केली जात होती का, हे आता मोजमाप केल्यानंतरच उघडकीस येईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन वानखडे यांनी सांगितले. वाहतूक परवान्यापेक्षा जादा सागवान आढळल्यास संबंधितांवर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.