To hold an independent Vidarbha, a Protestant at Delhi | स्वतंत्र विदर्भासाठी प्राऊटिस्टचे दिल्ली येथे धरणे
स्वतंत्र विदर्भासाठी प्राऊटिस्टचे दिल्ली येथे धरणे

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्वतंत्र विदर्भ राज्य घोषित करा या मागणीसाठी प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियाच्यावतीने दिल्ली येथील जंतरमंतरवर धरणे आंदोलन करण्यात आले.
त्यावेळी मधुकर निस्ताने यांच्या नेतृत्वात पंतप्रधान कार्यालयात जाऊन मागणीचे निवेदन देण्यात आले. २०१४ च्या निवडणुकीत विदर्भाचा मुद्दा पुढे करून भाजपने महाराष्ट्रात सत्ता मिळविली. भाजपने त्यांच्या राष्ट्रीय अधिवेशनातही छोटे राज्य निर्मितीचा ठराव घेतला. मात्र आता भाजपला या मुद्याचे विस्मरण झाले आहे. विदर्भातील सिंचन, शेतकरी आत्महत्या, रोजगार, रस्ते आदींचा बॅकलॉग भरून काढण्यास तत्कालिन काँग्रेस सरकार अपयशी ठरले. त्यावेळी भाजपची भूमिका आक्रमक दिसत होती. मात्र आता या मुद्यावर भाजपला विस्मरण झाले आहे. त्यामुळे विदर्भातील समस्यांची दखल घ्यावी व स्वतंत्र विदर्भ राज्य घोषित करावे या मागणीसाठी निवेदन देण्यात आला.
या आंदोलनात प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियाचे राष्ट्रीय संयोजक आचार्य संतोषनंद अवधूत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विदर्भ संघटक मधुकर निस्ताने, यवतमाळ जिल्हाध्यक्ष विवेक डेहणकर, शहर अध्यक्ष अरूण कपिल, उपाध्यक्ष नरेंद्र धनरे, संघटक राजू विरदंडे, तालुकाध्यक्ष मोहन पवार, दिलीप पवार, पांडुरंग किरणापुरे, संजय कटकमवार, मधुकर बोरकर, संभू वाढई, नारायण राठोड, गोपाल नामपेल्लीवार, आकाराम वानखडे, लक्ष्मण आत्राम, प्रभाकर कोवे आदी उपस्थित होते.

Web Title: To hold an independent Vidarbha, a Protestant at Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.