एचआयव्हीबाधितांची औषधासाठी पायपीट
By Admin | Updated: February 26, 2016 02:14 IST2016-02-26T02:14:03+5:302016-02-26T02:14:03+5:30
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ‘एआरटी’ सेंटरमध्ये एचआयव्ही, एड्सग्रस्तांसाठी असलेल्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

एचआयव्हीबाधितांची औषधासाठी पायपीट
आरोग्य धोक्यात : साडेतीन हजार रुग्णांचा प्रश्न, शासकीय रुग्णालयातील एआरटी केंद्र
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ‘एआरटी’ सेंटरमध्ये एचआयव्ही, एड्सग्रस्तांसाठी असलेल्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांना औषधीसाठी पायपीट करावी लागत असून त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे.
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एचआयव्ही - एड्स उपचार केंद्रात (एआरटी) जिल्ह्यातील तीन हजार ५०० रुग्ण लाईन वनचा उपचार घेत आहेत. आता औषधा सुधारणा झाल्यानंतर एकच गोळी नियमित घ्यावी लागते. या औषधीचा नॅको (नॅशनल एड्स कंटोल आॅर्गनायझेशन) कडून पूरवठा केला जातो. टीएलई (टीनोफोव्हीट लॅमी व्होडींग इफा व्हिरेंस) या गोळीत तिन्ही घटक आहेत. मात्र महिनाभरापासून या गोळीचा पुरवठा बंद असल्याने एचआयव्हीबाधितांची परवड होत आहे. खासगीत ही औषधी अतिशय महाग आहे. महिन्याकाठी दोन हजार रुपयांचे औषध घ्यावे लागते.
व्यक्तीचा सीडीफोर ( पांढऱ्या पेशी) कमी झाल्यानंतर त्याची रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. हळूहळू एचआयव्हीचा व्हायरस वाढत जातो. त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता मोठ्याप्रमाणात बळावते. त्यामुळे टीएलई गोळ््या नियमित घेणे आवश्यक आहे. मात्र मागील काही महिन्यापासून या औषधाचा मागणी इतका पुरवठा होत नाही. त्यामुळे औषधासाठी आलेल्या रुग्णाला परत जावे लागते. शासकीय रुग्णालयातील एआरटी सेंटरच्या कर्मचाऱ्यांकडून रुग्णांना येथील संपर्क क्रमांक देवून परत पाठविल्या जाते. औषधी आली की नाही, याची खातरजमा करूनच रुग्णांनी यावे, अशी सूचना दिली जात आहे. औषधांचा तातडीने पुरवठा व्हावा यासाठी थेट नॅकोकडे पाठपुरावा केला जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)