'His' electricity bill jumped on 28 thousand | ‘त्यांच्या’ वीज बिलाने मारली ३०० रुपयांवरून १ लाख २८ हजारांवर उडी
‘त्यांच्या’ वीज बिलाने मारली ३०० रुपयांवरून १ लाख २८ हजारांवर उडी

ठळक मुद्देघरात फक्त तीन बल्ब आणि एक टेबलफॅन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: महावितरणने अवाजवी वीज बिल पाठवल्याच्या अनेक घटनांमध्ये अजून एक घटना सामील झाली आहे. मुकूटबन येथून जवळच असलेल्या गणेशपूर येथील एका वृद्ध दांपत्याला तब्बल १ लाख २८ हजारांचे वीज बिल आले आहे.
मोल मजुरी करून गुजराण करीत असलेले हे वृद्ध कुटुंब एका चंद्रमोळी झोपडीवजा घरात राहते. त्यांच्याकडे इनमीन तीन बल्ब व एक टेबलफॅन एवढीच विद्युत उपकरणे आहेत. ज्यांचं बिल आजवर ३०० ते ३५० रुपयांच्या दरम्यान येत होतं. नानाजी साधू निखाडे (६५) असे या गृहस्थांचे नाव आहे. त्यांना आॅगस्ट महिन्यात आलेलं हे बिल पाहून त्यांचे डोळेच पांढरे व्हायचे बाकी राहिले आहेत. एवढे बिल कुठून भरायचे असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.


Web Title: 'His' electricity bill jumped on 28 thousand
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.