कोल्हे ले-आऊटमध्ये इसमाचा खून

By Admin | Updated: March 1, 2017 01:21 IST2017-03-01T01:21:18+5:302017-03-01T01:21:18+5:30

स्थानिक दारव्हा मार्गावर असलेल्या कोल्हे ले-आऊट भाग २ मध्ये इसमाच्या खुनाची घटना चार दिवसानंतर उघडकीस आली.

His blood in the leopard le-out | कोल्हे ले-आऊटमध्ये इसमाचा खून

कोल्हे ले-आऊटमध्ये इसमाचा खून

कुजलेला मृतदेह : चार दिवसांपूर्वीची घटना
यवतमाळ : स्थानिक दारव्हा मार्गावर असलेल्या कोल्हे ले-आऊट भाग २ मध्ये इसमाच्या खुनाची घटना चार दिवसानंतर उघडकीस आली. परिसरात दुर्गंधी पसरल्याने संशयावरून पोलिसांना सोमवारी रात्री बोलविण्यात आले. तेव्हा ही घटना उघड झाली.
मोहन गणूजी वाघमारे (५४) असे या इसमाचे नाव आहे. मोहन वाघमारे हे मागील दोन महिन्यांपासून घरात एकटेच राहत होते. त्यांची मुलगी हैदराबाद येथे तर मुलगा चंद्रपूरला शिक्षणासाठी आहे. पत्नी मुद्रिका ही दोन महिन्यांपासून माहेरी बोरीसिंह येथे राहत असल्याचे सांगण्यात आले. मोहन वाघमारे हे घरात एकटेच होते. सोमवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची बाब मनूबाई पठाडे यांनी वाघमारे यांचे भाऊ गणेश शिवराम वाघमारे यांना सांगितली. त्यानंतर घराचे दार ठोठावले असता प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संशय बळावल्यानंतर वडगाव रोड पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी रात्री १०.३० च्या सुमारास घराचे दार तोडले असता मोहन वाघमारे यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.
कुणी तरी अज्ञात मारेकऱ्यांनी मोहन वाघमारे यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला. तो हत्या केल्यानंतर जिन्याने छतावरून उडी मारुन बाहेर पळाल्याचे स्पष्ट होते. जिन्यावर रक्ताने माखलेल्या बुटाचे ठसे उमटले आहे. शिवाय छतावरही रक्ताचे डाग आहेत. मारेकरी एक किंवा दोन असावे, असा संशय आहे. मारेकरी हा परिचित असावा, त्याने दार ठोठावूनच घरात प्रवेश केला आणि नंतर त्यांच्यात झटापट झाली असावी असा अंदाज परिस्थितीजन्य स्थितीवरून लावल्या जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: His blood in the leopard le-out