पुसद तालुक्यात वादळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:00 IST2020-06-12T05:00:00+5:302020-06-12T05:00:35+5:30

वादळी पावसाने बुधवारपासून तालुक्यात हजेरी लावली. बुधवारी तालुक्यात सरासरी ५७ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत तालुक्यात ९१.५० मिमी पाऊस कोसळला. पेरणी योग्य मृगधारा बरसल्याने शेती मशागतीला वेग आला आहे. बळीराजा पेरणीच्या तयारीत व्यस्त झाला आहे. ४ जूनला ३४.५० मिमी पाऊस झाल्यानंतर एकदम पावसाने बुधवारी दुपारीच हजेरी लावली.

Heavy rain in Pusad taluka | पुसद तालुक्यात वादळी पाऊस

पुसद तालुक्यात वादळी पाऊस

ठळक मुद्देफुलवाडीत टीनपत्रे उडाली : आत्तापर्यंत ९७ मिमी पाऊस, बळीराजा सुखावला

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : गेल्या आठ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने बुधवारपासून पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. वादळी पावसामुळे फुलवाडी परिसरात अनेक घरांवरील टीनपत्रे उडाली. मात्र या पावसामुळे बळीराजा सुखावला असून पेरणीच्या तयारीत व्यस्त आहे.
वादळी पावसाने बुधवारपासून तालुक्यात हजेरी लावली. बुधवारी तालुक्यात सरासरी ५७ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत तालुक्यात ९१.५० मिमी पाऊस कोसळला. पेरणी योग्य मृगधारा बरसल्याने शेती मशागतीला वेग आला आहे. बळीराजा पेरणीच्या तयारीत व्यस्त झाला आहे. ४ जूनला ३४.५० मिमी पाऊस झाल्यानंतर एकदम पावसाने बुधवारी दुपारीच हजेरी लावली. विजांचा कडकडाट झाला. तब्बल अर्धातास पाऊस कोसळला. वादळामुळे फुलवाडी परिसरातील काही घरांवरील टीनपत्रे उडाली. त्यामुळे घरात ठेवलेला शेतमाल, बियाणे, खते ओले झाले. राजेंद्र चव्हाण यांनी पंचनामा करून मदत करावी, अशी मागणी तहसीलदारांकडे केली आहे.
शेंबाळपिंपरी महसूल मंडळांतर्गत येणाऱ्या फुलवाडी, देवठाणा, जवळी, सांडवा, मांडवा आदी परिसरातील काही घरांवरील टीनपत्रे बुधवारच्या वादळाने उडाली. बुधवारी वरुड मंडळात ३० मिमी, ब्राम्हणगाव सात मिमी, खंडाळा ४४ मिमी, शेंबाळपिंपरी २७ मिमी, जांबबाजार ३७ मिमी, गौळ (खुर्द) ३० मिमी तर बेलोरा (बु) १२ मिमी पाऊस झाला. या पावसामुळे फुलवाडी परिसरातील शेतकऱ्यांचे बियाणे व खत भिजल्याचे शेतकरी इशांत चव्हाण यांनी सांगितले.

पेरणी योग्य पावसाने मिळाला दिलासा
आतापर्यंत तालुक्यात ९१.५० मिमी पाऊस बरसला. कृषी विभागाने १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन केले होते. आता पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकरी पेरणीच्या कामी लागले आहे. बळीराजा समाधानी असल्याचे पिंपळखुटा येथील शेतकरी रणवीर टाले यांनी सांगितले. दरम्यान बुधवारी झालेल्या वादळी पावसामुळे शेतकºयांच्या घरांचे अथवा शेतमालाचे नुकसान झाले. त्याचा पंचनामा करण्याचे आदेश सर्व मंडळ अधिकारी व तलाठ्यांना दिल्याचे तहसीलदार प्रा. वैशाख वाहूरवाघ यांनी सांगितले.

Web Title: Heavy rain in Pusad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस