आरोग्य सेवकाचे स्टिंग आॅपरेशन

By Admin | Updated: July 1, 2015 00:11 IST2015-07-01T00:11:14+5:302015-07-01T00:11:14+5:30

आरोग्यसेवक असताना डॉक्टर बनून गोरगरीब रुग्णांच्या जीविताशी खेळ करणाऱ्या एका बोगस डॉक्टरचा मंगळवारी...

Health worker's sting operation | आरोग्य सेवकाचे स्टिंग आॅपरेशन

आरोग्य सेवकाचे स्टिंग आॅपरेशन

बोगस डॉक्टर बनून उपचार : शासकीय औषधीसाठाही जप्त
कळंब : आरोग्यसेवक असताना डॉक्टर बनून गोरगरीब रुग्णांच्या जीविताशी खेळ करणाऱ्या एका बोगस डॉक्टरचा मंगळवारी स्टिंग आॅपरेशनद्वारे पर्दाफाश करण्यात आला. या डॉक्टरच्या ताब्यातून रुग्णांना विकली जाणारी शासकीय औषधीही जप्त करण्यात आली. नीळकंठ वसाड असे या बोगस डॉक्टरचे नाव आहे.
नीळकंठ हा राळेगाव तालुक्यात आरोग्य सेवक म्हणून कार्यरत आहे. मात्र त्याने कळंब येथील खरेदी विक्री संघाचा एक गाळा विकत घेऊन तेथे आपली डॉक्टरकीची दुकानदारी थाटली होती. हा बोगस डॉक्टरचा व्यवसाय बंद कर अशा सूचना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मंगला उईके यांनी त्याला वारंवार दिल्या. मात्र त्यानंतरही त्याचा व्यवसाय सुरूच होता. अखेर सोमवारी सायंकाळी स्टिंग आॅपरेशनद्वारे या तथाकथित डॉक्टरचे बिंग फोडण्यात आले.
पोलीस जमादार संजय नागभीडकर यांना रुग्ण बनवून वसाड याच्याकडे पाठविण्यात आले. त्याने संजय यांची तपासणीही केली. त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मंगला उईके, गटविकास अधिकारी डॉ. मनोहर नाल्हे यांच्या पथकाने तेथे धाड घालून बोगस डॉक्टर बनलेल्या नीळकंठ वसाड याला ताब्यात घेतले. त्याच्या दुकानातून औषधीसाठा जप्त करण्यात आला.
त्यातील ९० टक्के औषधी ही शासकीय असल्याचे सांगण्यात आले. सदर औषधी तो गोरगरीब रुग्णांना विकायचा. वृत्तलिहिस्तोवर त्याच्यावर पोलीस कारवाई सुरू होती. शासनाच्या संयुक्त पथकानेच स्टिंग आॅपरेशन करुन बोगस डॉक्टरचा हा पर्दाफाश केला. या कारवाईत विस्तार अधिकारी अशोक ठाकरे, आरोग्य पर्यवेक्षक भूपती रुढे, जयदेव पाटील, जमादार दादाराव जाधव आदी सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Health worker's sting operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.