आरोग्य सभापतींचा प्रभाग बरबटला

By Admin | Updated: June 16, 2017 01:41 IST2017-06-16T01:41:04+5:302017-06-16T01:41:04+5:30

शहरात स्वच्छतेचा बोजवरा उडाला असून खुद्द आरोग्य सभापतींच्या प्रभाग क्रमांक १६ मध्येच विदारक स्थिती निर्माण झाली आहे.

Health Board of Barabata | आरोग्य सभापतींचा प्रभाग बरबटला

आरोग्य सभापतींचा प्रभाग बरबटला

यवतमाळ नगरपरिषद : नाल्या तुंबल्या, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरात स्वच्छतेचा बोजवरा उडाला असून खुद्द आरोग्य सभापतींच्या प्रभाग क्रमांक १६ मध्येच विदारक स्थिती निर्माण झाली आहे. या प्रभागातील नागरिक त्रस्त झाले असून पालिकेत नव्याने समाविष्ठ झालेल्या क्षेत्रातील स्वच्छतेची यंत्रणा पूर्णत: कोलमडली आहे.
ऐन पावसाळ््यात नागरी वस्त्यामध्ये कचऱ्याचे ढिगारे लागल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. साचलेल्या कचऱ्यातून उग्र दर्प येत असल्याने वसाहतीमध्ये राहणे कठीण झाले आहे. प्रभाग १६ मधील अंजेनय सोसायटीच्या अगदी प्रवेद्वारावरच कचऱ्याचा मोठा ढिग आहे. येथील नाल्याची कधीतरी सफाई होत असून ती रस्त्याच्या कडेवर काढून ठेवली जाते. पावसाच्या पाण्याने ही घाण वाहून इतरत्र पसरण्याची भीती आहे. चिन्मय बालआश्रमासमोरच कचऱ्याचा ढिग असून तिथे मोकट जनावरे, कुत्रे, डुक्कर यांचा मुक्त संचार असतो. हा कचरा पसरविण्याचे काम या प्राण्यांकडून केले जाते. प्रभागातील समस्योबाबत वारंवार तक्रारी करूनही कोणतीच उपाय योजना केली जात नाही, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. ठाकूर प्लॉट परिसरातील सर्वाजनिक हापसी बंद असल्याने तिथे पाणी टंचाई आहे. सिंघानिया नगरात शिवाजी महाराजांच्या तैल चित्रासमोर कचऱ्या ढिग लागतो. अनेक भागात घंटा गाडीच फिरकत नसल्याने घरातील कचरा उघड्यावर टाकण्या शिवाय पर्याय नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.

इतर प्रभाग भयावह
भाजपाच्या सत्ताधारी आरोग्य सभापतींच्या प्रभागीच स्थिती गंभीर असले तर इतर प्रभागांची कल्पना ा केलेलेच बरे. एकीकडे केंद्र आणि राज्य शासनाकडून स्मार्ट सिटी याजनेची संकल्पना राबविली जात आहे. तर भाजपाची सत्ता असलेल्या पालिकेत मात्र दैनंदिन स्वच्छतेची कामे व्यवस्थित होताना दिसत नाही. स्वच्छतेवर पालिकेकडून महिन्याकाठी लाखो रुपये खर्च केले जातात. हा पैसा नेमका कशावर खर्च होतो असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.

Web Title: Health Board of Barabata