The Headmaster will let the with family to hold | मुख्याध्यापक सहकुटुंब धरणे देणार
मुख्याध्यापक सहकुटुंब धरणे देणार

ठळक मुद्देनिवेदनातून इशारा : शिक्षण विभाग प्रश्न सोडवित नसल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : खासगी अनुदानित शाळांचे आर्थिक प्रश्न निकाली काढले जात नसल्याने शिक्षक, कर्मचाऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागते. यावर तत्काळ तोडगा न काढल्यास मुख्याध्यापक सहकुटुंब धरणे आंदोलन करतील, असा इशारा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने दिला आहे. यासंदर्भात माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांच्यामार्फत अमरावती शिक्षण उपसंचालकांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
जिल्ह्यातील खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांचे माहे सप्टेंबरचे वेतन यासह ऑक्टोबरचे मासिक वेतन दिवाळीपूर्वी मिळावे, ही मागणी या निवेदनातून प्रामुख्याने करण्यात आली आहे. वेतनातील अनियमिततेमुळे शिक्षक, कर्मचाऱ्यांवर गृह व इतर कर्जाच्या व्याजाचा भुर्दंड बसत आहे. काही शाळांचे ऑनलाईनमध्ये वेतन होत नाही. त्यामुळे ऑफलाईन वेतन अदा करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. हा प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकाºयांना निवेदन देताना मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश भुमकाळे, सचिव भुमन्ना बोमकंटीवार, विदर्भ कृती समितीचे अध्यक्ष निरज डफळे, पांडुरंग साखरकर, यवतमाळ शहर सचिव माधव धवने, ग्रामीण सचिव देवदत्त भोयर, दत्ता देशपांडे, यशवंत ताजने, अरविंद मांजरे, प्राथमिक संघाचे मधुकर काठोळे आदी उपस्थित होते.


Web Title: The Headmaster will let the with family to hold
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.