मित्राला फसविल्याच्या पश्चात्तापाने 'त्याने' संपविले स्वत:ला; वापरली अनोखी पद्धत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2021 17:41 IST2021-10-23T17:38:57+5:302021-10-23T17:41:33+5:30
Yawatmal News हायप्रोफाईल महिलेच्या नावाने फेक अकाउंट बनवून मैत्री सांभाळणाऱ्या संदेशला त्याच्या कृत्याचा पश्चात्ताप झाला. आपल्या सुस्वभावी डॉक्टर मित्राला आपण दोन कोटी रुपयांनी ठगविले, या दु:खातच त्याने आत्महत्येचा मार्ग निवडला.

मित्राला फसविल्याच्या पश्चात्तापाने 'त्याने' संपविले स्वत:ला; वापरली अनोखी पद्धत
यवतमाळ : हायप्रोफाईल महिलेच्या नावाने फेक अकाउंट बनवून मैत्री सांभाळणाऱ्या संदेशला त्याच्या कृत्याचा पश्चात्ताप झाला. आपल्या सुस्वभावी डॉक्टर मित्राला आपण दोन कोटी रुपयांनी ठगविले, या दु:खातच त्याने आत्महत्येचा मार्ग निवडला. आपल्या आठ पानाच्या सुसाईड नोटमध्ये संदेश अनिल मानकर याने स्वत:ला झालेला पश्चात्ताप विशद केला.
आई-वडिलांच्या निधनानंतर एकाकी जीवन जगणारा संदेश अनिल मानकर (२१) याने सोशल मीडियाचा वापर करीत स्वत:चे भावविश्व तयार केले होते.
यातूनच अनन्यासिंग ओबेरॉय या नावाने त्याने अनेक मोठ्या व्यावसायिक व व्यापाऱ्याशी मैत्रीपूर्ण संबंध तयार केले होते. निखळ मैत्री असल्यानेच दिल्लीतील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शल्य चिकित्सकाने संदेशला अडचणीच्या काळात दोन कोटींची रोख आणून दिली. मात्र, नंतर हे प्रकरण पोलिसांत गेल्याने संदेशला अटक झाली. कारागृहातून बाहेर आल्यानंतर कारण नसताना चांगल्या मित्राची आपण फसवणूक केली ही भावना संदेशला सतावत होती. यातच त्याने स्वत:ला संपविण्याचे निश्चित केले. त्यासाठी त्याने स्वत:च्या कौशल्याचा वापर करीत मृत्यूचा सुखद मार्ग कोणता याचाही शोध घेतला. संदेशने मृत्यूपूर्वी आठ पानांची चिठ्ठी लिहिली. त्यामध्ये त्याने मोबाइल मेसेजमध्ये वापरतो तशी भाषा वापरली आहे. इंग्रजी लेटरमध्ये हिंदी शब्द तयार करून ही सुसाइड नोट अतिशय भावनिकपणे लिहिलेली आहे.
अशा आत्महत्येची पहिलीच नोंद
संदेशने आत्महत्या करताना स्वत:ला व शरीराला कुठलाही त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली. यासाठी त्याने नायट्रोजन गॅसचा वापर केला. काळ्या प्लास्टिक पिशवीला नायट्रोजन गॅसचा पाईप लावला. नंतर ती प्लास्टिक पिशवी डोक्यात घालून घेतली. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन नायट्रोजनचे प्रमाण वाढले. यात काही सेकंदातच मृत्यू होतो. शास्त्रीय भाषेत हॅपी डेथ ट्रीक म्हणून याला संबोधले जाते. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. बत्रा यांनी अशा प्रकारे आत्महत्या केल्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले.