शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

डौलदार पिकांमुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंदी छटा

By admin | Updated: August 24, 2015 00:15 IST

मृग नक्षत्रातच यंदा मान्सूनचा पाऊस आल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणी आटोपली. त्यानंतर पावसाने खंड दिल्याने ऐन उगवणीच्या काळात ...

समाधानकारक परिस्थिती : यावर्षी तरी संकटातून तरण्याची अपेक्षा, योग्य काळजी घेण्याचे कृषी विभागाचे आवाहनदारव्हा : मृग नक्षत्रातच यंदा मान्सूनचा पाऊस आल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणी आटोपली. त्यानंतर पावसाने खंड दिल्याने ऐन उगवणीच्या काळात पिकांना फटका बसण्याची स्थिती निर्माण झाली होती. मात्र जुलैच्या शेवटच्या आठवड्यात समाधानकार पाऊस झाल्याने तालुक्यातील पीक परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून सातत्याने निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकपाणी हातातून गेले. त्यामुळे या वर्षी शेतकऱ्यांना मोठ्या आशा आहेत. मागिल वर्षाच्या तुलनेत यावर्षी तालुक्यात कपाशी लागवडीचे क्षेत्र अधिक प्रमाणात आहे. तब्बल ४१ हजार ८१४ हेक्टर क्षेत्रावर कपाशीचा पेरा आहे. त्या तुलनेत सोयाबीनचे क्षेत्र मात्र घटले आहे. सोयाबिनचा पेरा १५ हजार ७८८ हेक्टर क्षेत्रावर आहे. सुरूवातीला मृगाच्या पावसात कपाशीची लागवड जवळपास शेतकऱ्यांनी आटोपली. मध्यंतरी झालेल्या पावसाने या कपाशीला उभारी मिळाली असून आज कपाशीचे पीक डौलाने उभे आहे. या समोरही निसर्गाची साथ योग्यरित्या मिळाल्यास चांगल्या पिकांची अपेक्षा करण्यास हरकत नाही. परंतु कृषी तज्ञांच्या सल्ल्याने वेळेवर आवश्यकतेनुसार किटकनाशकांच्या फवारण्या आणि योग्य काळजी शेतकऱ्यांना घेणे गरजेचे आहे. तसे पाहता मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी फवारण्या फारशा करण्याची सध्या तरी गरज दिसत नाही. सध्या सोयाबिन व कापूस हे दोन्ही प्रमुख पीक फुलावस्थेत आहे. पिकांना फुलधारणा व फळधारणा या दोन अवस्थेत पाण्याची गरज अधिक भासत असते. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने योग्यवेळी पिकांना संजिवनी मिळाली आहे. सोयाबिनवर सध्या चक्रीभुंगा व पाने खाणाऱ्या अळींचा प्रादूर्भाव बघता प्रतिबंधात्मक फवारण्या सुरू आहेत. काहींनी कपाशीला उर्वरित रासायनिक खतांच्या मात्रा देणे सुरू केले आहे. ज्वारी पिकाला सध्या नत्राची गरज आहे. नत्राची योग्य मात्रा युरिया खतातून दिल्या जात असते. परंतु सध्या तालुक्यात युरियाची टंचाई आहे. या संदर्भात कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता पुढील काही दिवसातच खताची रॅक लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावर्षी दारव्हा तालुक्यात आतापर्यंत ५०१ मिमि. पावसाची नोंद झाली आहे. येत्या काळात आणखी पावसाची गरज असून निसर्गाने तशी साथ दिल्यास शेतकऱ्यांच्या पदरात दोन-तीन वर्षानंतर दोन पैसे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)