वडकीतील अतिक्रमणावर हातोडा
By Admin | Updated: April 6, 2017 00:32 IST2017-04-06T00:32:23+5:302017-04-06T00:32:23+5:30
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातच्या कामामध्ये अडथळा ठरत असलेले वडकी येथील अतिक्रमण काढण्याची मोहीम बुधवारी हाती घेण्यात आली.

वडकीतील अतिक्रमणावर हातोडा
किन्ही(जवादे) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातच्या कामामध्ये अडथळा ठरत असलेले वडकी येथील अतिक्रमण काढण्याची मोहीम बुधवारी हाती घेण्यात आली. पक्क्या बांधकामांवर हातोडा चालविण्यात आला. या कारवाईत अनेक दुकाने जमिनदोस्त झाली.
अतिक्रमण काढण्यासाठी संबंधित लोकांना सूचना देण्यात आल्या होत्या. काही लोकांनी अतिक्रमण काढले. यानंतरही राहिलेले अतिक्रमण जेसीबीने काढण्यात आले. सकाळपासूनच ही मोहीम हाती घेण्यात आली. लहान व्यावसायिकांचीही दुकाने यामध्ये पाडण्यात आल्याने त्यांच्यापुढे आता रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यावसायिकांचेही नुकसान झाले. ठाणेदार दीपक पवार आणि सहकाऱ्यांच्या उपस्थितीत तसेच यवतमाळ येथील पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. (वार्ताहर)