गुरुदेव दुर्गोत्सव मंडळ पहिले, समर्थ दुसरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:00 IST2019-09-30T05:00:00+5:302019-09-30T05:00:09+5:30
श्री गुरुदेव दुर्गोत्सव मंडळाला मिळाला आहे. स्टेट बँक चौकातील श्री समर्थ दुर्गोत्सव मंडळ दुसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसाचे मानकरी ठरले. कॉटन मार्केट चौकातील वैष्णवी दुर्गोत्सव मंडळाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. सन २०१८ च्या दुर्गोत्सवातील कामगिरीबद्दल या मंडळांना सन्मानित करण्यात आले आहे.

गुरुदेव दुर्गोत्सव मंडळ पहिले, समर्थ दुसरे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दुर्गोत्सवात उत्कृष्ट प्रदर्शनाचा पहिला पुरस्कार यवतमाळच्या वैद्यनगरातील श्री गुरुदेव दुर्गोत्सव मंडळाला मिळाला आहे. स्टेट बँक चौकातील श्री समर्थ दुर्गोत्सव मंडळ दुसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसाचे मानकरी ठरले. कॉटन मार्केट चौकातील वैष्णवी दुर्गोत्सव मंडळाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. सन २०१८ च्या दुर्गोत्सवातील कामगिरीबद्दल या मंडळांना सन्मानित करण्यात आले आहे.
येथील दक्षता भवनात जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या अध्यक्षतेत पारितोषिक वितरण झाले. नगर परिषद प्रशासकीय अधिकारी शशी नंदा, मोटार वाहन निरीक्षक देवधर, विद्युत कंपनीचे कार्यकारी अभियंता कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मंडळांनी धार्मिकतेसोबतच सामाजिक भान ठेवले. हे सर्व करताना प्रशासनाला सहकार्य केले.
प्रोत्साहनपर पहिले बक्षीस आझाद मैदानातील गुजराती नवरात्र उत्सव मंडळाला देण्यात आले. लोहारा येथील शिवाजी दुर्गोत्सव मंडळ द्वितीय स्थानी राहिले. या सर्व मंडळांना सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्त देण्यात आले. निवड समितीमध्ये गोविंद शर्मा, प्राचार्य तिवारी, प्रा. ताराचंद कंठाळे, प्रा. सुरपाम यांचा समावेश होता. त्यांना सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. प्रास्ताविक यवतमाळ शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनंजय सायरे व पोलीस जमादार प्रकाश देशमुख यांनी केले. आभार लोहारा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन लुले यांनी मानले. कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, दीपक वडगावकर, आनंद वागदकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.