शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेतून मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

By admin | Updated: October 23, 2016 02:01 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहून समाज जीवनातील विविध विषयांना हात घातला.

ज्ञानेश्वर इंगोले : पुसद येथे तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथीपुसद : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहून समाज जीवनातील विविध विषयांना हात घातला. शिक्षण, महिलोन्नती, कुटुंब, ग्रामविकास, तंटामुक्ती, जीवनकला, शेतकरी आदींबाबत त्यात चिंतन आहे. ग्रामगीतेतून राष्ट्रसंतांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या, असे प्रतिपादन हभप ज्ञानेश्वर इंगोले यांनी येथे केले. स्थानिक गुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने येथील देशमुखनगरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ४८ वी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ‘मानवतावादी संत तुकडोजी महाराज’ या विषयावर इंगोले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे सचिव प्रा. प्रकाश लामणे होते. यावेळी गुरुदेव भक्तांनी रांगेत बसून शिस्तबद्धपणे राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली अर्पण केली. सामूदायिक प्रार्थना, ध्यान, सामूदायिक नमस्कार, ग्रामगीता वाचन, राष्ट्रवंदना आदी कार्यक्रम उत्साहात पार पडले. त्यानंतर गुरुदेव प्रेमींनी राष्ट्रसंतांची खंजिरी भजने सादर संगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुरुदेव सेवा मंडळ पुसद तालुका शाखेचे नंदकुमार पंडित, शरद देशपांडे, ज्ञानेश्वर ताकतोडे, माधव जाधव, मनोहर बनस्कर, बाबासाहेब वाघमारे, गजानन जाधव, भाऊ बोपीनवार, ऋषभ तोडसाम, नागोराव तोडसाम, साहेबराव राठोड, भाऊ सोनटक्के, नरेश ढाले, प्रभाकर चव्हाण, अनिल अस्वार, संभाजी बळी, दशरथ सूर्यवंशी, प्रमोद जयस्वाल, राजवीर जयस्वाल, अ‍ॅड.वीरेंद्र देशमुख, छाया लामणे, ताई ढाले, ताई तोडसाम, ताई वाघमारे, वैष्णवी लामणे आदी उपस्थित होते. भजनात तबल्यावर भाऊ सोनटक्के, मनोहर बनस्कर, हार्मोनियमवर ज्ञानेश्वर ताकतोडे, ऋषभ तोडसाम यांनी साथ दिली. (प्रतिनिधी)