कब्रस्थानमध्ये अंत्ययात्रेला जाताना मोठी कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 21:49 IST2017-09-10T21:48:38+5:302017-09-10T21:49:10+5:30
कब्रस्थान आणि फुलसावंगी गावाच्या मधोमध वाहणाºया नाल्यामुळे अंत्ययात्रा घेऊन जाणाºया नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. गत १२ वर्षांपासून या नाल्यावर पूलच बांधला नाही.

कब्रस्थानमध्ये अंत्ययात्रेला जाताना मोठी कसरत
विवेक पांढरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
फुलसावंगी : कब्रस्थान आणि फुलसावंगी गावाच्या मधोमध वाहणाºया नाल्यामुळे अंत्ययात्रा घेऊन जाणाºया नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. गत १२ वर्षांपासून या नाल्यावर पूलच बांधला नाही. परिणामी गुडघाभर पाण्यातून रस्ता काढत नागरिकांना अत्यंसंस्कारात सहभागी व्हावे लागते.
महागाव तालुक्यातील फुलसावंगी गावालगत छोटा नाला आहे. दुसºया तिरावर कब्रस्थान आहे. या नाल्यावर काही वर्षापूर्वी पूल बांधला होता. परंतु निकृष्ठ बांधकामाने पुलाचे वाभाडे निघाले आहे. नाल्याचे पात्र मोठे आणि पूल लहान अशी अवस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पुलाचा प्रश्न शासनदरबारी धूळ खात पडला आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारात जाण्यासाठी मोठा अडथळा निर्माण होत आहे. पावसाळ््याच्या दिवसात तर मोठे हाल सोसावे लागते. दोन दिवसांपूर्वी गावातील शेख गुलाब शेख युसूफ यांचे हृदयविकाराने निधन झाले. रात्री ९.३० वाजता अंत्ययात्रा काढण्यात आली. नादुरूस्त पुलाच्या बाजुने अंधार होता. नाल्यात पाणी असल्याने निट चालताही येत नव्हते. अशा अवस्थेत प्रेत असलेली डोली नेताना तारेवरची कसरत करावी लागली.
बंधाºयाने वाढली पातळी
पुलाच्या खालच्या बाजुला २०० मीटर अंतरावर जलयुक्त शिवारचा बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे या पुलाजवळ पाणी असते. या पाण्यातून जाताना मोठा त्रास सहन करावा लागतो. गेल्या अनेक दिवसांपासून पुलाच्या दुरूस्तीची मागणी होत आहे. परंतु कुणीही लक्ष देत नसल्याने नागरिक संतप्त आहे.
कब्रस्थानकडे जाणाºया रस्त्यावरील पूल अतिशय महत्वाचा आहे. परंतु राजकीय मंडळी आणि अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केले. केवळ मुस्लिम समाजाचा वोट बँक म्हणून वापर करण्यात आला. त्यांच्या समस्यांकडे कुणी लक्ष दिले नाही.
- शेख मजहर शेख चाँद,
नागरिक, फुलसावंगी