शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

वनीकरणाच्या नावावर शासकीय यंत्रणांनी हडपला कोट्यवधींचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 11:15 IST

झाडे सोडा, खड्डेही सापडेना : म्हणे, यंदा लावली तीन लाख ९४ हजार झाडे

विशाल सोनटक्के लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वनसंपदेने नटलेल्या यवतमाळ जिल्ह्याला वनविभागातीलच खाबुगिरीची नजर लागली आहे. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील उघडे जंगल क्षेत्र २२५ स्क्वेअर किलोमीटरने घटले आहे. या अहवालानंतर वनविभागाने यंदा केलेल्या जिल्ह्यातील वृक्षारोपणाची माहिती घेतली असता यावर्षी लावलेल्या तीन लाख ९४ हजार झाडांचा थांगपत्ता लागला नाही. झाडे तर सोडा अनेक ठिकाणी वनविभागाने खोदलेले खड्डेही आढळले नाहीत.

जिल्ह्यात वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, अलीकडील काळात वाढते वणवे, अतिक्रमणांचा विळखा आणि वनविभागाच्या उदासीनतेमुळे जंगल क्षेत्रात मोठी घट होत आहे. यंदाच्या अहवालानुसार यवतमाळ जिल्ह्यातील उघडे वनक्षेत्र २०२१ मध्ये १३२१.०२ स्क्वेअर किलोमीटर होते. २०२४ मध्ये यात घट होऊन ते १०९७.८७ स्क्वेअर किलोमीटरवर आले आहे. वनीकरण विभागाकडून दरवर्षी वृक्षलागवडीवर कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या हरितीकरण तसेच वनमहोत्सवावरही लाखोंची उधळण होते. मध्यवर्ती रोपवाटिकांच्या आधुनिकीकरण व बळकटीकरणासाठी सामाजिक वनीकरण विभागाला भरीव निधी दिला जातो. सोबत पानथळे, सरोवरे आदी ठिकाणच्या जैवविविधतेच्या व्यवस्थापनासाठी निधीचे वाटप होते. मनरेगा, तसेच राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतूनही वृक्षलागवडीचा कार्यक्रम दरवर्षी राबविला जात असताना जंगल क्षेत्रात होत असलेली घट चिंताजनक आहे.

या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात विविध शासकीय यंत्रणांच्या वतीने यंदा केलेल्या वृक्षारोपणाचा आढावा घेतला असता बहुतांश ठिकाणी लावलेली रोपे तर सोडा, वनविभागाने खोदलेले खड्डेही आढळून आले नाहीत. 

हजारो झाडे गेली कुठे ?वनीकरण विभागासह विविध यंत्रणांच्या वतीने जुलै २०२४ मध्ये तब्बल तीन लाख ९४ हजार ८४७ रोपे लावल्याचे सांगितले जाते. यामध्ये पुसद विभागात सत्तरमाळ भाग १ आणि २ येथे प्रत्येकी ८,८८८ रोपे लावली आहेत. भाग ३ मध्ये २२,२२० तर भाग ४ येथे १८ हजार रोपांची लागवड केल्याचे सांगितले जाते. यवतमाळ विभागातील चिचबर्डी येथे सर्व्हे क्र. ४७१ मध्ये २२,२२० रोपे, तर पुसद विभागातील रोहणा दिग्रस येथे सर्व्हे क्र. ७७४ मध्ये तीन भागांत तब्बल ६१,८७३ झाडे लावल्याचे रेकॉर्ड आहे. यवतमाळ विभागातील सावंगी राऊत येथेही ११,११० रोपे लावल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात चिचबर्डी, रोहणा दिग्रस, तसेच सावंगी राऊत येथे संबंधित सर्व्हे क्रमांकावर झाडेच नसल्याचा प्रकार आढळून आला.

...म्हणे, वृक्षारोपण कार्यक्रम ठरावीक काळापुरताविविध यंत्रणांच्या वतीने केलेल्या वृक्षलागवडीच्या कार्यक्रमस्थळी आज झाडे दिसून येत नाहीत. याबाबत सामाजिक वनीकरण विभागाच्या जिल्हा वनीकरण अधिकारी प्रणिता पारधी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही वेळा त्या कार्यालयात उपलब्ध नव्हत्या. तेथे उपस्थित वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर मडावी यांना विचारले असता, तीन वर्षापासून आमच्या विभागाकडून वनीकरण झाले नसल्याचे ते म्हणाले. वनीकरण विभागातर्फे यापूर्वी वृक्षलागवडच्या ठिकाणीही आज झाडे नसल्याचे सांगितले असता वनीकरणाचा कार्यक्रम ठराविक कालावधीपुरता असतो, असे अजब उत्तर मडावी यांनी दिले.

टॅग्स :forestजंगलYavatmalयवतमाळforest departmentवनविभाग